टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मंगळवेढेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील कोरोना बधितांचा आकडा हजाराच्या पुढे गेला आहे.तर टेस्टिंग चे प्रमाण कमी झाल्याने रविवारी फक्त ४ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.तर ८ जणांना उपचार कालावधीनंतर घरी सोडण्यात आले आहे.
रविवार दि २० सप्टेंबर रोजी नागरिकांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेणेत आलेले नाहीत. तसेच रविवारी 44 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 44 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 4 आणि निगेटिव्ह 40 जणांचे अहवाल आलेले आहेत. सदरचे नागरिक हे मंगळवेढा 2 , दामाजीनगर 1 ,पोट 1 येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकटतम संपर्कातील आहेत.सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वॅबचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत १००६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ४३६ रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत ५५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आतापर्यंत १८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार हा संसर्गातून होत असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच कामाशिवाय घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे घाबरून न जाता स्वत:ची व इतरांची काळजी घ्यावी.
खोकताना, शिकताना हातरूमालाचा वापर करावा. आपले हात साबण व पाण्याने वारंवार स्वच्छ धुवावेत तसेच श्वसनसंस्थेचे विकार असणा-या व्यक्तीशी संपर्क ठेवताना अधिक काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Only 4 positive patients increased on mangalwedha; The number of patients was 1006
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज