टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील एक एकर क्षेत्र विकत घेतलेल्या जमिनीच्या दस्तावर हरकत म्हणुन तक्रारदार यांच्या बाजुने निकाल देण्यासाठी हुलजंती मंडळ अधिकारी सत्यवान निवृत्ती घुगे यास 10 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदारास जमीन खरेदीचे दस्तावर हरकत म्हणुन तक्रारी अर्ज आला होता. सदर हरकती अर्जावर तक्रारदार यांच्या बाजुने निकाल देण्यासाठी मंडळ अधिकारी सत्यवान घुगे हा 10 हजारांची लाच मागत होता.
तक्रारदार यांनी लवंगी ता.मंगळवेढा ,जि. सोलापूर येथे एक एकर क्षेत्र विकत घेतले होते. सदर जमीन खरेदीचे दस्तावर हरकत म्हणुन तक्रारी अर्ज आला होता. सदर हरकती अर्जावर तक्रारदार यांच्या बाजुने निकाल देण्यासाठी मंडळ अधिकारी सत्यवान घुगे हे 10 हजारांची लाच मागत असलेबाबत , तक्रारदार यांनी तक्रार नोंदविली होती.
त्यावरून आज तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी केली. त्यात तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी सत्यवान घुगे यांची तहसिल कार्यालय , मंगळवेढा येथे पंचासमक्ष भेट घेतली असता , सदर कामासाठी सत्यवान घुगे , मंडळ अधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडे १० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले होते.
त्यावरुन आज मंडळ अधिकारी सत्यवान घुगे , यांचेविरूध्द सापळा लावला असता सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचेकडून 10 हजारांच्या लाचेची रक्कम स्विकारली असता. मंडळ अधिकारी सत्यवान निवृत्ती घुगे , वय ३४ वर्षे यांना पकडण्यात आले आहे.
सदर प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाणे , सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंदविण्याचे कामकाज सुरु आहे.
सदरची सापळा कारवाई राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक,अॅन्टी करप्शन ब्युरो , पुणे ,संजय पाटील , अपर पोलीस अधीक्षक , अॅन्टी करप्शन ब्युरो , पुणे. संजीव पाटील पोलीस उपअधिक्षक , सोलापुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, पो.हवा . चंद्रकांत पवार , पो.ना. पदमानंद चंगरपल्लु . पो.ना प्रमोद पकाले यांनी केली आहे.
याद्वारे जनतेस आवाहन करण्यात येते की , जर कोणी शासकीय /निमशासकीय लोकसेवक त्याचे पदीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , सोलापूर कार्यालयाशी प्रत्यक्ष अगर हेल्पलाईन क्रमांक १०६४ , फोन नं . ०२१७ २३१२६६८ वर संपर्क साधावा.
Mangalwedha Board Officer satyavan ghuge While accepting a bribe
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज