टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 454 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत 618 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या 22 हजार 167 वर गेली आहे.
आज 404 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बाधितांची संख्या आता 22 हजार 167 झाली असून 618 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 6 हजार 940 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 14 हजार 575 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
आजच्या अहवालानूसार माळशिरस तालुक्यात सर्वाधिक 150 नव्या बाधितांची भर पडली असून या तालुक्यातील चार जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंढरपूर तालुक्यात 75 नवे बाधित रुग्ण आढळले असून या तालुक्यातीलही चार जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागात आज नवीन सहा कोरोना बाधित रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
माढा तालुक्यात 40 नवे कोरोना बाधित आढळले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
आज ‘या’ गावातील 16 जणांचा मृत्यू
पंढरपुरातील संग्राम चौकातील 45 वर्षीय महिला, मोहोळ तालुक्यातील सारोळे येथील 67 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्यातील शेटफळे येथील 65 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील 61 वर्षीय पुरुष, बार्शीतील ब्राह्मण गल्ली येथील 76 वर्षे पुरुष,
तर अक्कलकोट तालुक्यातील केगाव बु. येथील 48 वर्षिय पुरुष, माळशिरसमधील दत्तनगर येथील 65 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथील 80 वर्षीय महिला, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील 54 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथील साठ वर्षिय पुरुष, माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील 36 वर्षिय पुरुष,
आणि माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील 63 वर्षिय पुरुष, पंढरपुरातील कडबे गल्ली येथील 57 वर्षिय पुरुष, पंढरपुरातील गोकुळ नगर येथील 65 वर्षिय पुरुष, करमाळा तालुक्यातील पांगरी येथील 68 वर्षिय पुरुष, मोहोळ तालुक्यातील चिखली येथील 35 वर्षीय पुरुष अशा 16 जणांचा समावेश आहे.
दरम्यान पंढरपूर, बार्शी,माढा व माळशिरस या तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ही जिल्ह्याची चिंता वाढवू लागली आहे.
In Solapur rural area, 16 corona victims and 454 new corona positive
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज