टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघामधून भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अधिकृत तुतारी ए.बी. फॉर्म देण्यात आला आहे.
यामुळे अनिल सावंत हे तुतारी फुंकणार असल्याने मतदार संघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याविषयी उत्कंठा शिगेला पोहोचली होती.
काँग्रेस पक्षाच्या वतीने विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांना काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवारी भगीरथ भालके यांना निश्चित मानली जात असताना
भगीरथ भालके यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खा.शरद पवार यांनी तुतारी कडून इच्छुक असलेले अनिल सावंत यांना तात्काळ बोलावून घेऊन तुतारी कडून अर्ज भरण्यास सांगितले.
अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून अर्ज दाखल केला. आज मंगळवार दि.29 रोजी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे हस्ते अनिल सावंत यांना राष्ट्रवादी पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष रंधवे, श्याम गोगाव, कृष्णदेव लोंढे हे उपस्थित होते. अनिल सावंत यांना राष्ट्रवादी पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्यामुळे मतदार संघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष केला जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज