mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर समाजाची फसवणूक केली; अनेक योजना केल्या बंद : आ.गोपीचंद पडळकर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 5, 2021
in मंगळवेढा, राज्य

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यात अपघाताने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर समाजाची फसवणूक केल्या असल्याची घणाघाती टीका विधानपरिषद आ.गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आज नंदेश्वर गावात बोलत होते.

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख ,उपाध्यक्ष सुभाष मस्के,बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते माऊली हलणवर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,सिध्देश्वर कोकरे, माजी नगरसेवक चंद्रकांत पडवळे,पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर, धनगर समाजाचे नेते बापूसाहेब मेटकरी,धनाजी गडदे, अंकुश गरंडे,भारत गंरडे,आकाश डांगे, दत्ता साबणे, चंद्रकांत गंरडे आदीजन उपस्थित होते.

आ.पडळकर पुढे बोलताना म्हणाले की, धनगर समाजाला मदत करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. भाजप सरकारने धनगर समाजासाठी अनेक योजना लागू केल्या होत्या.

महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसने धनगर समाजाची फसवणूक करुन अनेक योजना बंद करण्याचे पाप यांनी केले आहे. यांना मते देऊन सुद्धा त्यांनी न्याय दिला नाही त्यांना आता जागा दाखवायची वेळ आली आहे.

तसेच या सरकारने शेतकऱ्यांना काडीमात्र मदत केली नाही आशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.लॉकडाऊन करून सरकार गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर सर्वांनी जाऊन पाहिले आपल्या 35 गावाच्या पाण्याचे राजकारण करून आजपर्यंत निवडुन आले आहेत.

येथील मजूर ऊसतोडणीसाठी या सरकारला हवा आहे म्हणून 35 गावातील शेतकऱ्यांना हे सरकार पाणी देत नाही. समाधान आवताडे यांना निवडून दिल्या नंतर 35 गावला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

विठ्ठल कारखाना कर्जाच्या खाईत नेला आहे.शेतकरी बिलासाठी आंदोलन करत आहेत ते आपला काय विकास करणार आता , हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात अनेक संकटे आली आहेत. इतर राज्यात कोरोनाची संख्या कमी आहे पण महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे याचे कारण शोधणे गरजेचे असल्याचे आ.पडळकर यांनी सांगितले.

सभापती सोमनाथ आवताडे म्हणाले की, समाधान आवताडे यांच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना आज त्यांच्या हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.

आत्तापर्यंत डाळींब सौदे असो,जनावरांचा बाजार असो असे अनेक शेतकरी हिताच्या योजना सुरू केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हाध्यक्ष देशमुख बोलताना म्हणाले की, राज्याचे समीकरण बदलणारी ही निवडणूक असून शेतकरी विरोधी या सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. दाखवायचा चेहरा एक बोलणे वेगळी अशी राष्ट्रवादी ची अवस्था आहे.

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना समाधान आवताडे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या हाताला काम मिळवून दिले आहे. उद्या आमदार झाले तर मतदारसंघात असलेली बेरोजगारी कायम निघून जाईल अनेक कुटुंब उभे राहतील असे त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गोपीचंद पडळकरधनगर समाजफसवणूकराष्ट्रवादी
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

August 11, 2022
मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

August 11, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

August 11, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

August 11, 2022
मंगळवेढ्यात पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल; आमदार समाधान आवताडेंनी बोलावली ‘या’ गावांची बैठक

देवांना साकडे! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पावसासाठी ग्रामदैवतांना घातला जलाभिषेक

August 11, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

अनेक पिके पाण्याअभावी कात टाकत आहेत, उजनीतील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढ्यातील गावांसाठी द्या; आ.आवताडेंची मागणी

August 11, 2022
खळबळ! महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ जणींना अटक

खळबळ! मंगळवेढ्यात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा, क्लब चालकासह नऊ जणांविरूध्द गुन्हे दाखल

August 10, 2022
दत्तात्रय भरणे औकातीत राहायचं, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही; आमदार तानाजी सावंत यांचा इशारा

मोठी बातमी! नामदार तानाजी सावंत यांना ‘हे’ खात मिळणार; मंत्रिपदाने मंगळवेढ्यात जल्लोष

August 10, 2022
देशभक्ती! मंगळवेढ्यामधून निघाली तब्बल 350 फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली; आमदारांनी वाजवला ढोल

देशभक्ती! मंगळवेढ्यामधून निघाली तब्बल 350 फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली; आमदारांनी वाजवला ढोल

August 9, 2022
Next Post
महाराष्ट्रात कडक निर्बंधांबाबत ‘या’ तारखेनंतर घोषणा होण्याची शक्यता?

Big breaking! सोलापुरातील सर्व दुकाने उद्यापासून 'या' तारखेपर्यंत बंद

ताज्या बातम्या

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

August 11, 2022
मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

August 11, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

August 11, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

August 11, 2022
मंगळवेढ्यात पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल; आमदार समाधान आवताडेंनी बोलावली ‘या’ गावांची बैठक

देवांना साकडे! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पावसासाठी ग्रामदैवतांना घातला जलाभिषेक

August 11, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

अनेक पिके पाण्याअभावी कात टाकत आहेत, उजनीतील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढ्यातील गावांसाठी द्या; आ.आवताडेंची मागणी

August 11, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..