टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सोलापूर शहरात सोमवार ते शुुक्रवार सकाळी ७ ते ८ या काळात अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने, कार्यालये सुरू असतील. बाकी सर्व बंद असेल. शुक्रवारी संध्याकाळी ७ ते सोमवारी सकाळी ८ या काळात संचारबंदी असेल.
सोमवार ते शुुक्रवारपर्यंत अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू असणार आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी याबाबतचे आदेश दिले.
बांधकाम, मालवाहतूक, कृषी संबंधित वाहतूक सुरू ठेवता येणार आहे. दरम्यान, बेकरी, दुध डेअरी, भाजीपाला, किराणा दुकान, खाद्यपदार्थांची दुकाने, मेडिकल स्टोअर हे सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
हाॅटेल किंवा खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत रूग्णालय, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा दुकानं बंद राहणार आहेत.
सोलापुरात मिनी लॉकडाऊन; भाजीपाला, किराणा, दुध डेअरी, खाद्यपदार्थांची दुकाने सुरू राहणार
वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सोलापूर शहरातील सर्व दुकाने उद्या मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भातील आदेश महापालिकेच्यावतीने काढण्यात आले आहेत.
दरम्यान, बेकरी, दुध डेअरी, भाजीपाला, किराणा दुकान, खाद्यपदार्थांची दुकाने, मेडिकल स्टोअर हे सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
हाॅटेल किंवा खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत रूग्णालय, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा दुकानं बंद राहणार आहेत.(लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज