टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात १६ खड़ी क्रशर जिल्हा महसूल प्रशासनाने गेल्या दोन दिवसापासून बंद केल्याचे समोर येत आहे. क्रशर सुरू ठेवण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या नसल्याचे महसूल प्रशासनाने सदरची कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
मंगळवेढा तालुक्यातील येळगी हुलजंती, लोणार, बोराळे, मंगळवेढा या भागात सुमारे १६ खडी क्रशर आहेत. खडी क्रशर काढण्यासाठी ग्रामपंचायत ना हरकत, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, महावितरण कंपनी,
जिल्हाधिकारी कार्यालय, प्रदूषण महामंडळ, उद्योग विभाग यासह विविध परवानग्यांची गरज असते. खडीक्रशर चालू केल्यानंतर उत्पादित मालासाठी स्टॉक लायसन ठेवावे लागते.
रॉयल्टी न भरल्यामुळे यापूर्वी अनेक खडी क्रशर चालकांना लाखो रुपयांचा दंड करण्यात आला होता. परंतु हा दंड न भरल्यामुळे संबंधित खडी चालकाच्या सातबारा उताऱ्या वरती लाखोंचा बोजा चढविण्यात आला आहे.
स्टॉक लायसन काढून घेतले नसल्याने जिल्हा महसूल प्रशासनाने गेल्या दोन दिवसापासून तालुक्यातील १६ खडी क्रशर बंद केले आहेत.
चालूवर्षी तालुक्याला गौणखनिज महसुलाचे साडे अकरा कोटीचे उद्दिष्ट असून गेल्या नऊ महिन्यात केवळ १ कोटी महसूल जमा झाला असून उर्वरित तीन महिन्यात साडेदहा कोटींचा महसूल गोळा करायचा आहे.
सन २०२१-२२ मध्ये वाळू, मुरूम व मातीची चोरटी वाहतूक व विक्री करणाऱ्या १२६ लोकांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांनी दंड न भरल्याने त्यांच्या उताऱ्यावर सुमारे २२ कोटींचा बोजा चढवला आहे.
खडी क्रशर बंद झाल्याने सर्व खडी क्रशर चालकांची बैठक घेऊन सर्व परवानग्या घेण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्याचे समजते.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज