टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील कृष्ण तलावावरील सुशोभिकरणाचे ब्लाॅक व लाईट पोलचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे ते पुन्हा चांगले करावे, बालाजीनगर येथील पोलीस पाटील हे बोगस डॉक्टरकीचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांना त्वरित निलंबित करावे,
मंगळवेढा शहरातील दामाजी चौकातील नगरपालिकेचा मुरुम चोरणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यास का टाळाटाळ केली जात आहे याचा खुलासा करावा,
शाळा नं पाच व इंग्लिश स्कूल शेजारील पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट होत आहे ते त्वरित थांबवा , नागणे गल्लीतील आडसुळ बोळामध्ये गटीरीवर त्वरित झाकण टाका ,
शहरातील गतिरोधक निघुन गेले पण त्या ठेकेदारांवर काय कारवाई केली याचा जनतेला खुलासा करावा, तहसिल कार्यालयाच्या शेजारील नवीन पाण्याची टाकी खराब बांधली व वेळेत पूर्ण झाली नसल्याने त्या ठेकेदारावर त्वरित कारवाई करा,
लमाणतांडा येथील सार्वजनिक वाचनालयात माजी सरपंचाचा संसार चालत असलेला तो बाहेर काढुन गावातील विद्यार्थी विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाचनालय खुले करुन द्या,
लमाणतांडा येथील समाज मंदिरात खाजगी पतसंस्था चालवत असलेल्या चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करा व २००१पासुन त्यांच्या कडुन ग्रामपंचायत कर वसुली करुन समाज मंदिर गावातील लोकांना खुले करा,
भारत भालके ही शासकीय सांस्कृतिक भवनात चालत आहे त्या भवनावर तिन मजली इमारत परवानगी न घेता बांधली त्यावर अधिकारी का बोलत नाहीत व त्या सांस्कृतिक भवनात गावातील एकही कार्यक्रम होवु देत नाही ते गावकऱ्यांना कार्यक्रमासाठी खुले करा व
नंदेश्वर येथील लक्ष्मण करे या एका व्यक्तीचे अतिक्रमण न काढता संपूर्ण गावातील काढा अशा विविध विषयांवर प्रहार जनशक्ती पक्ष/शेतकरी संघटना व प्रहार अपंग संघटना यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राकेश पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय राठोड, शहराध्यक्ष युवराज टेकाळे,
तालुका संपर्क प्रमुख शकिल खाटीक, शशिकांत पवार,रविनाथ पवार,आकाश पवार,अशिष पवार, संदिप राठोड, सर्जेराव पाराध्ये, सतिश जावळे, धनंजय माने, मिथुन पवार,अक्षय पवार, संग्राम राठोड,
सचिन राठोड, विजय पवार, अनिल दोडमिसे, नागेश मुदगुल, लक्ष्मण करे, रामा करे आंदोलनात सहभागी आहेत यावेळी जर अधिकारी लोकांनी याकडे दुर्लक्ष केले तर प्रत्येक कार्यालयात घुसून अधिकार्यांची तोंड काळे करणार असे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज