टीम मंगळवेढा टाईम्स ।
महावितरणच्या इलेक्ट्रिक पोलवरील आकडा टाकून केलेली वीजचोरी पकडल्याने सासू – सुनेने शिवीगाळ, धमकी देत महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केली.
यावेळी वायरमनला शिवीगाळ करून आकडा टाकलेली वायर नेण्यास विरोध करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घेरडी (ता सांगोला ) येथे घडली.
याबाबत प्रधान तंत्रज्ञ वैशाली दिगंबर देशपांडे (रा.शिवाजीनगर, सांगोला ) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी संबंधित महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
घेरडी येथील महावितरण शाखेच्या प्रधान तंत्रज्ञ वैशाली देशपांडे व वायरमन सचिन सुखदेव गावडे हे मंगळवारी वीजचोरीला आळा घालण्यासाठी घेरडी शिवारात साळुंखे यांच्या घरासमोर गेले होते.
त्यावेळी पोलवरील तारेवर आकडा टाकून वीजचोरी करीत असल्याचे निदर्शनास आले.
वायरमन आकडा काढून वायर गोळा करीत असताना साळुंखे यांच्या घरातील दोन महिलांनी ‘तुम्ही आकडा का काढला, वायर का गुंडाळून घेऊन जात आहे,
तुम्ही घेऊन जाऊ नका, ‘असे म्हणून वायरमन सचिन गावडे यांच्या हातातील वायर पूजा साळुंखे हिच्या सासूने हिसकावून घेत असताना त्याने वायर पकडीने कट केली.
यावेळी पूजा साळुंखे हिने वैशाली देशपांडे यांनी तोंडाला बांधलेला स्टोन धरून ओढल्याने त्यांचा चष्मा खाली पडून फुटला.
यावेळी त्या व्हिडिओ करीत असताना त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून घेऊन जमिनीवर आपटल्याने तोही फुटला.
यानंतर त्यांच्या अंगावर येऊन धक्काबुक्की करून सनकोटचा खिसा फाडून तुम्ही वायर कशी घेऊन जाता तेच बघतो, असे म्हणून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज