mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ‘या’ महत्त्वाच्या टिप्स वाचा!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ‘या’ महत्त्वाच्या टिप्स वाचा!

टीम मंगळवेढा टाईम्स । योग्य कौशल्ये आणि ज्ञानाच्या बळावर शेअर बाजार हा संपत्ती निर्माण करण्यासाठीचा मोठा स्रोत बनू शकतो. शेअर गुंतवणुकीतून आश्चर्यकारक उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांच्या कथा सोशल मिडियावर दिसत असतात. तुमच्या गुंतवणुकीवर इक्विटीमध्ये जास्त उत्पन्न मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्हाला पुढील घटकांचे अनुसरण करण्याची गरज आहे.

Important tips for first time investors in the stock market

मूलभूत गोष्टी जाणून घ्या:- हा एक वैश्विक नियम आहे. एखाद्या नव्या जगात प्रवेश करण्याकरिता मूलभूत गोष्टी जाणून घ्याव्यात. गुंतवणूकही त्याला अपवाद नाही. पहिल्यांदा तुम्ही विद्यार्थी बनणे आवश्यक आहे. प्रत्येक आवश्यक गोष्ट शिका लागेल.

कारण ‘ज्ञान हीच शक्ती आहे. दरम्यान, शेअर बाजार, गुंतवणूक आणि इतर आर्थिक संकल्पनांबद्दलच्या मूलभूत गोष्टी शिकण्यासाठी इंटरनेटवर भरपूर शोध घेता येतो. तुमचे डिमॅट खाते सांभाळणा-या ब्रोकरकडून तुम्ही पुष्कळ माहिती मिळवू शकता.

अचूक वेळ महत्त्वाची:- गुंतवणुकीचा विचार केल्यास, योग्य वेळ हेच सर्वकाही असते. तुमची योग्य आरओआय (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट) मिळवण्याची संधी पूर्णपणे यावर अवलंबून असते. असे म्हणताकी, शेअर्स जेव्हा अगदी निचांकी पातळीवर व्यापार करतात, तेव्हा बाजारात प्रवेश करणे महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे, किंमती उच्चांकी स्थितीत असतात, तेव्हा बाहेर पडणे उत्तम असते. मात्र, तुम्ही शेअर्सवर पैसा लावण्यापूर्वी तुमचा उच्चांक ठरलेला असावा.

उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या शेअरवर १५ टक्के परताा मिळवण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. तुमची गुंतवणूक ज्यावेळी या पातळीला स्पर्श करेल, तेव्हा लोभी होऊ नका. हाच नियम नुकसानीच्या स्थितीतही लागू पडतो. तुमच्या आवडत्या स्टॉकवर ५ टक्के नुकसान होण्याची जोखीम असल्यास, त्या वेळेला विक्री करण्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करू नका. दरम्यान, आपण गुंतवणुकीसाठी ज्या कंपन्यांची निवड केली आहे, ती अत्यंत योग्य असावी. आपण कळपाच्या मानसिकतेनुसार सुरक्षितरित्या आपली चाल खेळू शकता. तसेच प्रोफेशनल ट्रेडर्स आणि विश्लेषकांचे अहवालही अभ्यासू शकता. असा दृष्टीकोन ठेवल्यास, आपल्याला बाजाराच्या कामकाजावर पकड घेण्यास मदत होईल.

तथापि, गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी विवेकी विचार गरजेचा आहे. उदाहरणार्थ, ब-याच वेळा, शॉर्ट टर्ममध्ये, बाजार आणि प्रोफेशनल ट्रेडर्स तात्कालिक अफवा आणि शेअर्सच्या ख-या मूल्यावर परिणाम न करणाऱ्या बातम्यांनुसार वर्तन करतात. गुंतवणूकदार म्हणून, इतर लोक जे करतात, तेच अनुकरण करण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो. मात्र तुमचे बाजाराविषयीचे ज्ञान आणि शेअरच्या क्षेत्रांबद्दलचा दीर्घकालीन दृष्टीकोन तयार असेल तर इतरांपेक्षा जास्त परतावा मिळवता येईल.

गुंतवणुकीची रक्कम ठरवा:- इक्विटीमध्ये तुम्हाला किती विस्तार हवा आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. आपण तरुण गुंतवणूकदार असल्यास, तुमच्यासमोर अजून ३० वर्षे कामाचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी जास्त पैसे गुंतवा. विविध क्षेत्रांशी संबंधित शेअर्सचा मोठा पोर्टफोलिओ तुम्ही तयार करू शकता. पण तुम्ही पन्नाशीत शेअर बाजारात प्रवेश केला तर खबरदारी बाळगणे, हेच महत्त्वाचे आहे. स्थिर परतावा देण्यासाठी ओळखल्या जाणा-या स्टॉक्मध्येच पैसा गुंतवा.

चुकांमधून शिका; चुकांमुळे निराश होऊ नका:- तुमच्या पोर्टफोलिओचे नियमितपणे निरीक्षण करा आणि चुका ओळखा. या क्रियेमुळे भविष्यात एकच चूक पुन्हा पुन्हा करणे टाळता येईल. तसेच अधिक अनुभव मिळवण्यासाठी तुम्ही विविध क्षेत्रांत गुंतवणूक केली पाहिजे, त्या व्यापारातून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे म्हणतात की, प्रोफेशनल ट्रेडर्सदेखील चुका करतात. म्हणून चूक झाल्यावर निराश होऊ नका. सतत शिकणे हा प्रवासाचा भाग आहे. प्रत्येक चूक म्हणजे एक अनुभवी गुंतवणूकदार होण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.

तुमच्या वित्तीय उद्दिष्टांबद्दल स्पष्ट रहा:- गुंतवणुक करताना, तुम्ही आपले उद्दिष्ट आणि भविष्यात आपल्याला रक्कम पुन्हा कधी हवी आहे, त्या संभाव्य काळाबद्दल स्पष्टता राखायला हवी. तुम्हाला तुमचा आरओआय काही वर्षातच हवा असेल तर कमी अस्थिर शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. मात्र तुम्हाला दीर्घकालीन योजना हवी असेल, जसे की, तुमच्या मुलांचे परदेशात शिक्षण किंवा स्वप्नातील घर विकत घेणे, तर तुम्ही त्यानुसार, गुंतवणूक केली पाहिजे.

अंतिम सूचना:- गुंतवणूकदार म्हणून, सेक्टर्स आणि शेअर्सबद्दल सखोल माहिती घएतानाच, तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजा जाणून घेणेही आवश्यक आहे. सर्व कंपन्या लाभदायक नसतात, हे तुम्हाला कळेल. त्यामुळेच तुम्ही चतुराईने निवड करणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आपण योग्य प्रयत्नांसह संशोधन केले तर एक चांगली सुरुवात करता येईल. यामुळे शेअर बाजारात गुंतवणुकीसंबंधी जोखीम कमी करण्यास व यशस्वी होण्यास मदत होईल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
दिलासा! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्क्यांवर कायम : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दिलासा! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्क्यांवर कायम : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

भीमा नदीकाठच्या वीज समस्येवर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई! आमदार समाधान आवताडेंच्या पत्राची तात्काळ दखल; पंढरपूर-मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

June 24, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा; NA परमिशनची कटकट संपली; तुकडे बंदी कायद्यातही मोठा बदल

June 24, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

क्रॅकडाऊन! मंगळवेढ्यात रस्त्यावर आडवी वाहने लावताय? सावधान! थेट पोलिसांत होणार रवानगी; ‘या’ कारवाईने खळबळ

June 24, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

गुटखा मिळत नसल्याने संतापला; सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेड्या

June 24, 2026
धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उडाली धावपळ; हरकती नोंदवण्यासाठी अवघे ‘इतके’ दिवस शिल्लक

June 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा