टीम मंगळवेढा टाईम्स ।
वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच खेडोपड्यातून मंगळवेढ्या सारख्या तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्रवासी नागरिकांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये म्हणून
मंगळवेढा येथील दै.दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे यांनी चिरंजीव विराज दिगंबर भगरे याच्या 14 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने
मंगळवेढा बसस्थानक येथे जेष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना गैरसोय होऊ नये म्हणून बसण्यासाठी दोन सिमेंट बाकडे भेट दिले.त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कृतीने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर कार्यक्रमास विराज भगरे, संपादक दिगंबर भगरे, आगार व्यवस्थापक संजय भोसले, सहाय्यक वाहतूक अधिक्षक शरद वाघमारे, वाहतूक निरीक्षक योगेश गवळी, गणेश गवळी,शरद पाटील, वांगीकर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आगार व्यवस्थापक यांनी दिगंबर भगरे यांच्या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल आभार मानले.
मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी म्हणून मी आपल्या मंगळवेढा बसस्थानकावर बसण्यासाठी दोन बाकडे भेट दिली.
आपल्या पाल्यांच्या किंवा स्व:तच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येकाने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन काहीतरी सामाजिक कार्य करावे जेणेकरून आपल्या या कृतीमुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल.
दिगंबर भगरे, मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज