mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

द्राक्ष बागायतदारांनो सावधान! तोतया पोलीस फिरतायत तुमच्या मागावर; मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; तपासणीच्या बहाण्याने चालकाच्या डोळ्यादेखत रक्कम लंपास

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 22, 2026
in क्राईम, मंगळवेढा
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

टीम मंगळवेढा टाईम्स न्युज ।

​मंगळवेढा तालुक्यात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, आता चक्क पोलिसांच्या नावाने लूटमार करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

मंगळवेढा-मरवडे रोडवरील फटेवाडी शिवारात दोन अज्ञात तोतया पोलिसांनी द्राक्ष खरेदीसाठी जाणाऱ्या एका चालकाला अडवून त्याच्याकडील ९० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

​नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, इमतियाज मोहम्मद हुसेन (वय ४०, रा. सागर, कर्नाटक) हे त्यांच्या मालकाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. KA 18 B 2434) मधून द्राक्ष खरेदी करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथे जात होते. काल मंगळवारी सकाळी ८:३० च्या सुमारास ते मरवडे ते मंगळवेढा रोडवर असताना, पाठीमागून एका काळ्या रंगाच्या बुलेटवरून दोन तरुण आले.

​फिल्मी स्टाईलने घातला दरोडा

​बुलेटवरील तरुणांनी हुसेन यांच्या गाडीला हॉर्न वाजवून बाजूला घेण्यास सांगितले. गाडी थांबताच, खाकी पँट घातलेल्या एका इसमाने आम्ही पोलीस आहोत असे सांगून बनावट ओळखपत्र दाखवले.

तुमच्या गाडीत गुटखा आणि दारू आहे, आम्हाला चेक करायचे आहे, असे म्हणत त्यांनी चालकाला बोलण्यात गुंतवले. हुसेन यांचे लक्ष विचलित करून आरोपींनी सीटखाली ठेवलेली ९० हजार रुपयांची रोकड अत्यंत शिताफीने चोरली आणि मरवडे गावाच्या दिशेने पळ काढला.

​बुलेटचा पाठलाग केला पण…

​काही वेळानंतर हुसेन यांना सीटखालील पैसे गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ आपल्या पिकअपमधून आरोपींच्या बुलेटचा सुमारे ४ किमीपर्यंत पाठलाग केला, मात्र वेगाने असलेल्या बुलेटचा थांगपत्ता लागला नाही. अखेर हुसेन यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

​पोलीस तपासाचे आव्हान

​या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मंगळवेढा पोलीस आता या ‘बुलेट’ सवार तोतया पोलिसांचा शोध घेत असून, सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

रस्त्यात कुणीही अज्ञात व्यक्ती पोलीस असल्याचे सांगून गाडी थांबवत असेल, तर सतर्क राहा. संशय आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: तोतया पोलीस

संबंधित बातम्या

हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातून पत्रकार नवत्रे व ग्रामसेवक पाटील निर्दोष मुक्त; पुराव्याअभावी न्यायालयातून नाव वगळले;​ राजकीय सूडबुद्धीचा डाव उधळला

August 17, 2026

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

मंगळवेढ्यातील ‘त्या’ एका घटनेने खळबळ! प्रांत कार्यालयाशेजारी मध्यरात्री नक्की काय घडलं? वाचा पडद्यामागचे सत्य…

August 17, 2026
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मंगळवेढ्यात आज घुमणार देशभक्तीचा सूर! ‘सुरसंगम’ व ‘माजी सैनिक संघटने’तर्फे ‘मेरे देशप्रेमियों…’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

August 15, 2026
Next Post
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

भावा-भावातील वाद विकोपाला! मंगळवेढ्यात शेतीच्या वादातून तुफान हाणामारी; संतापलेल्या भावाचा थेट डोक्यात प्रहार

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातून पत्रकार नवत्रे व ग्रामसेवक पाटील निर्दोष मुक्त; पुराव्याअभावी न्यायालयातून नाव वगळले;​ राजकीय सूडबुद्धीचा डाव उधळला

August 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..