टीम मंगळवेढा टाईम्स।
ग्रामसेविका श्रीमती संगीता माने यांनी आजपर्यंत जनमानसात मिसळून काम केले असल्यामुळे त्यांना शासनाचा पुरस्कार मिळाला असल्याचे प्रतिपादन माळेवाडीचे सरपंच सौ.रेखा माळी यांनी केले आहे.
ते ग्रामपंचायत तांडोर, तामदर्डीच्या ग्रामसेवक सौ.संगीता माने यांचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत माळेवाडीच्या सरपंच सौ.रेखा अमोगसिद्ध माळी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माळेवाडीचे मा.सरपंच एम.डी.माळी, मेजर मलकाप्पा माळी, अमोगसिद्ध माळी सिद्धापूर जेष्ठ नागरिक महादेव कोळी, डोके ताई, विमल पवार ताई, म्हमाणे ताई व माने मॅडम यांचा बोराळे येथील वाघमारे परिवार उपस्थित होते.
सौ.माळी पुढे बोलताना म्हणाल्या की, फक्त तीन महिने माळेवाडी गावात संगीता माने यांनी काम केले आहे.
स्वभाव खूप कडक पण त्या तेवढ्याच मायाळू असल्यामुळे त्यांनी गावात सर्वसामान्य नागरिकांत मिसळून काम करणे पसंत केले होते.
माळेवाडी येथील नागरिकांच्या मनात त्यांनी एक वेळेचं स्थान निर्माण केले आहे.
ग्रामसेवकांनी गावात काम करत असताना कार्यालयात बसून काम करणेपेक्षा जनमाणसात मिसळून काम करावे अशी त्यांची प्रामाणिक भूमिका असल्याचे सरपंच माळी यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज