टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील माळेवाडी येथील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक रवी सोनवणे यांनी सरपंच यांच्या बोगस सहीने ग्रामपंचायत खात्यातील रक्कम काढून आर्थिक गैरव्यवहार करणे,वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणे,अनियमीत कामकाज आदी कारणास्तव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी सदर ग्रामसेवकास निलंबीत केले आहे.
ग्रामसेवक सोनवणे यांनी दि.२२ फेब्रुवारी २०१९ रोजी घरपट्टी,विज कर वसुली रक्कम ग्रामपंचायतीचे बँक खाते क्रमांकावरती न भरता नियमबाह्य हातशिल्लक ठेवून परस्पर खर्च करून ग्रामपंचायतीचे कामकाजामध्ये आर्थिक अनियमितता केली आहे.
मंगळवेढयाच्या गटविकास अधिकारी यांच्या अहवालावरून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.यामध्ये ग्रामसेवकाने जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केला आहे.
निलंबन कालावधीत ग्रामसेवकाने कोणतीही खाजगी नोकरी अथवा धंदा,व्यवसाय केल्याचे निदर्शनास आलेस त्यांचा उदरनिर्वाह भत्ता मिळण्यास ते अपात्र ठरतील असा इशारा त्या आदेशात नमूद केला आहे.सोनवणे यांचे मुख्यालय पंचायत समिती बार्शी देण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज