टीम मंगळवेढा टाइम्स ।
पंढरपूर तालुक्यात पहिल्या टप्प्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मंगळवेढ्याच्या दामाजी परिवाराचे नेते समाधान आवताडे यांनी आपल्या गटाची ताकद वाढविण्यासाठी मतदार संघातील गावात आपले दामाजी परिवाराचे स्वतंत्र उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उतरविले होते.
यामध्ये याच भागातील प्रस्थापित नेत्यासमोर गटाचे आव्हान देत जवळपास ४० ग्रामपंचायत सदस्य विजयी करून हक्काची ठिकाण तयार करण्यात मोठे यश मिळविले आहे.
मंगळवेढा पंढरपूर मतदार संघातील पंढरपूर मधील २२ गावांपैकी १७ गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत दामाजी परिवाराने आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यामधील ४० उमेदवार विजयी तर काही उमेदवार थोड्या फार फरकाने पराभूत झाले आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत दामाजी परिवाराचे समाधान आवताडे यांना या भागातील लोकांच्या संपर्कासाठी बरीच ओढाताण करावी लागली होती.
ती अडचण लक्षात घेता हक्काची नेतेमंडळी तयार करण्यासाठी दामाजी परिवाराने या निवडणुकीत महत्वाची भूमिका पार पाडली आहे, त्यामध्ये बरेच यश मिळाले आहे. मंगळवेढा भागात दामाजी परिवार हा नेहमीच आग्रस्थानी ठेवण्यात आवताडे यांना यश आलेले आहे.
मागील प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ,कृषी उद्योग संघ,विविध कार्यकारी सोसायटी अशा सर्व निवडणुकीत कायम यश मिळाले असुन पंढरपुर भागातही आपले बस्थान बसविण्यासाठी चांगलीच तयारी ठेवली आहे.
पंढरपूर भागातील जनसामान्यांचा समाधान आवताडे यांच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला असून या भागातील जनतेच्या आशा पल्लवित होत आहेत.समाधान आवताडे यांच्या वरती विश्वास टाकत हे एक सक्षम नेतृत्व म्हणून पंढरपूर तालुक्यात सूर निघत आहे.
सध्या दोन्ही तालुक्याला विकासमार्गावर आणणारा दुवा म्हणून समाधान आवताडे यांच्या नावाची चर्चा होत आहे.
समाधान आवताडे यांच्या पंढरपुर ग्रामपंचायतीतील धमाकेदार एन्ट्री लक्षवेधी ठरली असून यापुढे पंढरपुरातील राजकारणात समाधान अवताडे यांच्याकडे वाढत चाललेला जनतेचा कल आणि त्यांचे राजकीय उपद्रव्यामुल्य हे लक्षात घेऊनच राजकीय विश्लेषकांना यापुढील विश्लेषण करावे लागेल असे दिसते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज