मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
नदीतून बाळु काढल्यामुळे तक्रारदार यांच्यावर वाळुची कारवाई न करण्यासाठी ५०००/- रुपये लाच स्वीकारताना श्रीमंत मसाजी भालेराव (वय ५०, बठाण ग्रामपंचायत कर्मचारी) व गजानन शंकरराव चाफेकर (वय ३२, तलाठी, सज्जा मुढवी, अतिरिक्त कार्यभार सज्जा बठाण) यांना रंगेहात पकडले आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यापूर्वी प्रांत कार्यालयातील तलाठी सुरज नळे लाच प्रकरण ताजे असताना आज ही दुसरी घडल्याने मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे घराचे बांधकाम चालु असुन, बांधकामासाठी बाळु कमी पडल्याने, तक्रारदार यांनी त्यांचे गावाजवळुन बठाण हद्दीतुन जाणान्या
भीमा नदीतून बाळु काढल्यामुळे तक्रारदार यांच्यावर वाळुची कारवाई न करण्यासाठी म्हणुन ५ हजार रुपये लाचेची मागणी केली म्हणुन तक्रार प्राप्त झाली होती.
प्राप्त तक्रारी नुसार केलेल्या पडताळणीमध्ये यातील आलोसे क्रं. ०१ व ०२ यांनी कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५००० रुपये लाचेची मागणी करून, ते स्विकारण्याचे मान्य केले.
त्यामुळे आज दि.१७ जुलै रोजी सापळा कारवाईमध्ये यातील आलोसे क्र. ०१ यांनी लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे
यातील आलोसे क्रं. ०१ व ०२ यांना ताब्यात घेण्यात आले असुन, मंगळवेढा पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
ही कारवाई अमोल तांबे, पोलीस अधिक्षक, एसीबी, पुणे, डॉ. शीतल जानवे / खराडे, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, पुणे. परिवेक्षण अधिकारी,
सापळा अधिकारी सापळा पथक श्री. गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर श्री. चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर सदरची कारवाई पोलीस अंमलदार पोह/ प्रमोद पकाले, पोना / संतोष नरोटे, पोकों/ गजानन किणगी, चापोह / राहुल गायकवाड, नेम. एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज