mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी! चार टप्प्यात दिली जाणार कोरोनाची लस

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 10, 2020
in सोलापूर, आरोग्य
चांगली बातमी! कोरोनाचे पाहिले लसीकरण ‘या’ देशात; 12 डिसेंबरपासून लस टोचली जाण्याची शक्यता

टीम मंगळवेढा टाईम्स ।

जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी झाली असून ही लस प्रथम शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना देण्यात येणार आहे.

लसीकरणामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईनचे कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक आणि कोमॉर्बिड रूग्ण असे चार टप्पे केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिली. पहिल्या टप्प्यात 30 हजार 284 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

कोरोना लसीकरणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, लस व शीत साखळी व्यवस्थापक डॉ. गजानन जाधव,

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल नवले, धर्मगुरू काझी अमजद अली यांच्यासह समाज कल्याण, कामगार कल्याणचे प्रतिनिधी, एनसीसी कमांडर, नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी, माध्यमिक आणि प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, आयएमए प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत लसीकरणाबाबत नियोजन आणि आराखड्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली. श्री. शंभरकर म्हणाले, कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण आणि औषधाशिवाय पर्याय नाही. समाजामध्ये लसीकरणाबाबत जागरूकता आणण्यासाठी सर्व क्षेत्रातील व्यक्तींना बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे.

लसीकरणाचा आराखडा आणि नियोजन अचूक होण्यासाठी प्रयत्न करावेत. लस देण्यासाठी डाटा फिडिंगच्या कामाला गती देऊन त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सर्व नियोजन 16 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

जिल्ह्यात 300 बुथचे नियोजन करून आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असेल तरच त्यांना लस मिळेल. शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा डाटा अचूकपणे द्यावा.

श्री. शंभरकर यांनी लसीकरणासाठी लागणाऱ्या कोल्ड चैनविषयी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. लसीकरणावेळी सुरक्षेसाठी पोलीस, एनसीसी यांची सुरक्षा घेता येईल, यावर चर्चा झाली.

जागतिक आरोग्य संघटनेचे सोलापूरचे सल्लागार डॉ. अमोल गायकवाड यांनी सादरीकरणाद्वारे लसीकरणाच्या तयारीची माहिती दिली. पुढील आठवड्यात जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लसीकरणाबाबत प्रशिक्षण होणार आहे.

तसेच जे प्रत्यक्ष लस देणार आहेत, त्यांचे 18 डिसेंबरला प्रशिक्षण होणार असून एका बुथवर 100 जणांनाच लस दिली जाईल. याठिकाणी विविध पाच प्रकारचे सदस्य असणार आहेत.

लसीकरणादिवशी गर्दी, गोंधळ होऊ नये, यासाठी ज्यांना लस दिली जाणार आहे, त्यांना लसीकरणाचा दिवस एसएमएसद्वारे दिला जाणार आहे. लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला अर्धा तास वेटिंग रूममध्ये थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

यावेळी डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांनी पोलिओ लसीकरणाबाबत माहिती दिली. 17 जानेवारीला पोलिओची लस 3 लाख 44 हजार पाच वर्षाच्या आतील बालकांना दिली जाणार आहे. यासाठी 2449 लसीकरण केंद्र, 338 टीम तयार करण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना लससोलापूर
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
मंगळवेढ्यात तोतया इसम उभा करुन जमीन खरेदी केल्याप्रकरणी कोतवालसह अन्य एकाजण अटकेत; API अंकुश वाघमोडे यांची कारवाई

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उद्या दमा व फुफ्फुस रोग निदान शिबिर व स्पायरोमेट्री मशिनद्वारे मोफत तपासणी

January 29, 2023
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

मोठी बातमी! शरद पवार तब्बल नऊ वर्षानंतर मंगळवेढा दौऱ्यावर; आज ‘या’ सोहळ्यास उपस्थित राहणार

January 28, 2023

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत निंबोणीत आज मोफत हृदयरोग तपासणी शिबिर

January 27, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

January 25, 2023
आ.समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम; विद्यार्थ्यांना ‘इतक्या’ हजार वह्या व शैक्षणिक साहित्यांचे वाटप होणार

जाणीव! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयात मंजूर; आ.आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश

January 24, 2023
जिल्हाधिकारी साहेब! वाळू माफियांची दहशत वाढली; वाळू ठेकदाराकडून शेतकऱ्यांना मारहाण

लाडाचा जावई! माहेरात गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण

January 25, 2023
महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

एकाच मैदानात दोघेही! महेंद्र गायकवाड अन् सिकंदर शेख पुन्हा एका आखाड्यात; या लक्षवेधी लढतींकडे असणार लक्ष

January 23, 2023
हळदी-कुंकू समारंभात विधवा महिलांना सुवासिनी अन् संक्रांतीच्या वाणाचा मान; मंगळवेढ्यातील अनोख्या उपक्रमाची चर्चा

हळदी-कुंकू समारंभात विधवा महिलांना सुवासिनी अन् संक्रांतीच्या वाणाचा मान; मंगळवेढ्यातील अनोख्या उपक्रमाची चर्चा

January 23, 2023
Next Post
सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर, ‘या’ तारखेला होणार गावनिहाय आरक्षण

पंढरपूर पोलिसांची चमकदार कामगिरी! सुपारी घेऊन खून करण्याच्या तयारीत असणाऱ्यांना बंदुकसह घेतले ताब्यात

ताज्या बातम्या

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

January 31, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सर्वत्र कौतुक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा पुर्नविवाह प्रथेस मंजुरी

January 30, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा