मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
वृत्तपत्र क्षेत्रामध्ये सातत्याने गेली तेरा वर्ष अविरतपणे काम करत असलेले वृत्तपत्र म्हणजे साप्ताहिक रणयुग टाईम्स होय.या वृत्तपत्राचा १३ वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा बेगमपूर येथील विश्वजीत मंगल कार्यालय साजिरी लॉन्स येथे दिनांक 18 एप्रिल रोजी आयोजित केला आहे.
या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून बेगमपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज दि.17 एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साप्ताहिक रणयुग टाइम्सचे संपादक प्रमोद बिनवडे यांनी दिली.
मंगळवेढा येथील सुप्रसिद्ध शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय.सी.यु.,एल.एल.पी.यांच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे.
साप्ताहिक रणयुग टाईम्स या वृत्तपत्राने सातत्याने सामाजिक भान ठेवून कायमच काम केले आहे. याचाच एक भाग म्हणून वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य व गरजू रुग्णांना या मोफत शिबिराचा लाभ व्हावा याच उद्देशाने हे शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिरामध्ये महिलांच्या संपूर्ण आजाराची मोफत तपासणी,गरोदर महिलांची तपासणी व त्यांना योग्य मार्गदर्शन, वारंवार गर्भपात होणे यावर योग्य मार्गदर्शन, मासिक पाळीचे त्रास, वंध्यत्वावर मार्गदर्शन, अंगावरून पांढरे व लाल जाणे यावर तपासणी व मार्गदर्शन, रक्तातील साखर तपासणे,ईसीजी मध्ये 50% सवलत,
ट्रेडमिल टेस्ट मध्ये 50% सवलत, विशेष रक्ताच्या तपासणीवर 50% सवलत,औषधांमध्ये 10% टक्के सवलत यासह विविध आजारांवर मोफत तपासणी होणार असून याचबरोबर छातीत दुखणे, धाप लागणे, छातीत धडधड होणे, चक्कर येणे, पायावर सूज येणे,सहज थकवा जाणवणे, छातीत जडपणा वाटणे,अस्वस्थ वाटणे ,मधुमेह रुग्ण तसेच उच्च रक्तदाब गटाचे रुग्ण ई. रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संपादक प्रमोद बिनवडे यांनी केले आहे.
हे मोफत आरोग्य शिबिर शिर्के मल्टीस्पेशालिटीचे प्रमुख डॉ शरद शिर्के, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्रिती शिर्के,सुप्रसिद्ध डॉ.अमोल चव्हाण,अस्थीरोग तज्ञ डॉ. उदयसिंह दत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रणयुग टाईम्सच्या वतीने करण्यात आले आहे.
या वृत्तपत्राने कायमच सर्वसमावेशक व समाजहिताची पत्रकारिता केली
साप्ताहिक रणयुग टाईम्स हे वृत्तपत्र कायमच सर्वसामान्य घटकाला केंद्रस्थानी मानून गेल्या १३ वर्षांपासून सातत्याने मोहोळ व मंगळवेढा तालुक्यात काम करत आहे. या वृत्तपत्राने कायमच सर्वसमावेशक व समाजहिताची पत्रकारिता केली आहे. याच अनुषंगाने या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हे मोफत आरोग्य शिबिर शिर्के मल्टीस्पेशालिटीच्या वतीने व महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आयोजित केले आहे.- डॉ.शरद शिर्के,
मंगळवेढा
—————@
उपेक्षित व दुर्लक्षित घटकांना माझ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला
कोणत्याही प्रकारची पत्रकारितेची पार्श्वभूमी नसताना वडीलांच्या मार्गदर्शनाखाली मी अथक प्रयत्नाने आणि समाजभान राखून गेली तेरा वर्ष सातत्याने समाजातील उपेक्षित व दुर्लक्षित घटकांना माझ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
त्याचबरोबर वृत्तपत्राच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमात सुद्धा सक्रिय सहभाग घेतला. याचाच एक भाग म्हणून वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिर्के हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.शरद शिर्के यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. तरी गरजूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा. प्रमोद बिनवडे
संपादक
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज