मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सांगोला तालुक्यातील जवळा येथील शाळेकडून आषाढी एकादशीनिमित्त काढलेल्या मुलांच्या दिंडीत ‘ज्ञानोबा तुकोबा विठू नामाचा गजर करीत फुगडी खेळताना चक्कर येऊन
जि. प. चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती साहेबराव बाबासाहेब पाटील (वय ७४) यांचे धक्कादायकरित्या निधन झाले. शनिवारी सकाळी १०:३० च्या सुमारास शाळा परिसराच्या आवारात ही घटना घडली.
यानंतर तातडीने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात भाऊ, पाच बहिणी, पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष, जवळा गटातून जि. प. सदस्य तसेच जवळा ग्रामपंचायतीचे त्यांनी सलग १५ वर्षे बिनविरोध सरपंच पदावर काम पाहिले.
किसान आर्मी वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांचे ते मामा होत. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्यावर जवळा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज