टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विद्यमान चेअरमन आमदार समाधानदादा अवताडे यांच्या गटाने निवडणुकीसाठी विचारविनिमय बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
आज दि.2 जून पासून या बैठका सुरू होणार असून तालुक्यातील ब्रह्मपुरी मरवडे, भोसे, आंधळगाव, मंगळवेढा या पाच गावात या बैठका आयोजित करण्यात आले आहेत. आज दोन जून पासून या बैठकीला सुरुवात होत आहे.
आज दुपारी एक वाजता ब्रह्मपुरी गटाची बैठक मल्लीकर्जून मंगल कार्यालय सिद्धापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी चार वाजता मरवडे येथील सावित्री मंगल कार्यालय येथे त्या गटातील बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दि.३ जून रोजी सकाळी नऊ वाजता भोसे गटाची बैठक चिक्कलगी भुयार येथे आयोजित करण्यात आली आहे. साडेअकरा वाजता आंधळगाव गटाची बैठक सिद्धनाथ मंदिर पाटकळ येथे होणार आहे.
त्याच दिवशी दुपारी तीन वाजता मंगळवेढ्यातील रजपुत मंगल कार्यालयामध्ये मंगळवेढा गटाची बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीला मंगळवेढा शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह त्यांच्या गटातील कार्यकर्ते सभासद हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपल्या भागातील कार्यकर्त्यांना सभासदांना घेऊन यावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज