टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकानी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली असून जिल्हा प्रशासनाने हा आदेश काढला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून लॉकडाऊन, संचारबंदी, निर्बंध, वेगवेगळे नियम यांना लोक कंटाळून आणि वैतागून गेले आहेत.
आता निर्बंध आणि नियम म्हटलं की सामान्य माणसांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात आता कोरोना परततोय असं वाटत असतानाच ओमीक्रोनने झोप उडवली आहे.
त्यात फारसे कडक निर्बंध नसले तरी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अप्पर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी हे आदेश लागू केले आहेत. शांतता, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दि.२७ डिसेंबरच्या रात्री १० वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महानगरपालिका हद्द वगळून) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) , ३७ ( ३ ) लागू करण्यात आला आहे.
या आदेशानुसार शस्त्रे , झेंडा लावलेली काठी , शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे , व्यक्ती अगर त्यांची प्रेतयात्रा , प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे,
सार्वजनिक घोषणा करणे , असभ्य हावभाव करणे , ग्राम्य भाषा वापरणे , सभ्यता अगर नितीविरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील , त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल,
सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात आली आहे. यासह पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज