टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ, वडार गल्ली येथील शाळा क्रमांक. ३ मध्ये विविध समस्या आहेत. स्वच्छता पुरस्कार प्राप्त नगरपालिकेच्या शाळेच्या जवळ असलेल्या मुतारीच्या अस्वच्छतेची दयनीय अवस्थेमुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तरी त्या ठिकाणी सर्व गोरगरीब लोकांची मुले शिकायला आहेत म्हणून दुर्लक्ष केले जात आहे? ह्या नगरपालिकेला पुरस्कार कोणत्या निकषांवर दिला जातो हा संशोधनाचा विषय आहे? नगरसेवक कुठे गायब आहेत? असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत.
गेल्या ३ ते ४ वर्षापासुन सतत लेखी तक्रार देवून सुध्दा तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे आमच्या माग्ण्या सात ते आठ दिवसात पूर्ण न झाल्यास नगरपालिके समोर पालाकांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्तानी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव, भाजपा शहराध्यक्ष शुशांत हजारे, सतिश मुदगुल उपस्थित होते.
या आहेत प्रमुख मागण्या:–
शाळेचा राष्ट्रध्वज कट्टा जवळच मुतारी आहे. तरी ती मुतारी अस्वच्छ व ना दुरूस्ती स्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी नविन मुतारी बाहेरील बाजूस गटारीवर करुन मिळावी.
शाळेच्या मागील दोन वर्ग खोल्या स्लॅब इमारत छत गळते आहे.तरी त्या ठिकाणी स्लॅब दुरूस्ती करुन मिळावी.
शाळेत मध्ये फरशीकरण व रंगकाम करुन द्यावे तसेच दरवाजे व खिडकी नविन बसवून देण्यात यावे.
शाळेत मागील विद्यार्थी साठी असलेल्या मुतारीवर पत्रा टाकून देणे.
शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नाही परंतु शाळे मागील जागा ही नगरपालिकेचे असुन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मैदानासाठी जागा वर्ग करावी.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज