टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात १८ वर्षीय मुलीचा पाठलाग करून मोबाइल मागून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अक्षय दगडू चव्हाण (रा.मंगळवेढा) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित मुलगी घरातून किराणा बाजार आणण्याकरिता चोखामेळा चौकात गेली होती. बाजार घेऊन घरी जात असताना रस्त्यामध्ये आरोपी अक्षय याने मोटारसायकलवरुन पीडितेच्या पाठीमागे जाऊन तिचा हात पकडला.
तसेच मोबाइल नंबर मागून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलीस उपनिरीक्षक प्रणोती यादव या अधिक तपास करीत आहेत.
Filed a case of molesting a girl by chasing her on mangalwedha
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज