टीम मंगळवेढा टाईम्स ।
सुनेला नांदण्यास येण्यास समजावून सांगण्यास गेलेल्या सासऱ्याचा मारहाण झाली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या सासऱ्याचा
काल शुक्रवारी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी मयत झाल्यानंतर कलम वाढ करण्यात येऊन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी, सून नांदावयास येत नाही म्हणून समजावून सांगण्यात आलेल्या सासऱ्यास सुनेच्या भावाकडून गंभीर मारहाण करण्यात आली होती. त्यांच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.
मृत आरतीच्या दीराने फिर्याद दिली होती. त्यांचे आई-वडील, भाऊ अमोल, चुलते राजाराम पाटील आणि दादा मेटकरी असे माझी वहिणी आरती हिला नांदण्यास येणेकरीता समजावून सांगण्यास गेलेले असताना भांडण झाले. त्यात गंभीर जखमी केले आहे.
म्हणून प्रसाद चौगुले व सोनाली चौगुले यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद अनिल अंबादास पाटील यांनी दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त
सुनेचा खून केला म्हणून मुलगा व पत्नी पोलिस कोठडीत आहेत. तर याच भांडणात सुनेच्या भावाने डोक्यात वीट घालून गंभीर जखमी करून खून केल्यामुळे सासरा मयत झाला आहे.
दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. तर पाच वर्षाचा चिमुकला मृत आई, जेलमधे असलेले वडील व मयत झालेल्या आजोबांची वाट पाहत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज