mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बापरे! आषाढी एकादशीपूर्वी कोविड पोहचला सोलापूर जिल्ह्यात; ‘या’ तालुक्यात दोन पॉझिटिव्ह रुग्ण, प्रशासनाची चिंता वाढली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 31, 2025
in आरोग्य, सोलापूर

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून पालखी सोहळे निघण्याची तयारी होत असताना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

माळशिरस तालुक्यातील राऊतनगर-अकलूज व माळीनगर येथे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी प्रियांका शिंदे यांनी दिली असून नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सदरच्या रुग्णांनी प्रकृती अस्वथ्यामुळे खाजगी ऐपेक्स हॉस्पिटल व ऱ्हीदम हॉस्पिटल येथे उपचारासाठी भरती झाले असता खाजगी लॅबमध्ये तपासणी केली. त्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

याची खबर माळशिरस तालुका आरोग्य विभागाला लागताच त्यांनी सदर दोन्ही कुटुंबातील व्यक्तींची पूर्ण तपासणी केली आहे. यातील एका रुग्णाने प्रवास केल्याचे समोर आले आहे.

सदर दोन रुग्णांची माहिती सोलापूर जिल्हा चिकित्सकांना दिल्याचे डॉक्टर शिंदे यांनी सांगितले आहे. सद्य स्थितीमध्ये आषाढीसाठी येणाऱ्या पालखी सोहळ्याबाबत कोरोनाची उपाय योजना म्हणून जिल्हा आरोग्य विभागाकडून 25 हजार रॅट किट, 10 हजार आरटीपीसीआर ट्यूब, 10 हजार एन 95 मास्क, 50 हजार सर्जिकल मास्क, 500 पीपीइ किट, 100 एमएलच्या 1000 सँनिटायझर बाटल्या, 10 हजार हॅन्ड ग्लोजची मागणी केली आहे.

येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला अतिदक्षता बाळगावी लागणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विषयक काळजी घ्यावी. लक्षणे आढळताच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर शिंदे यांनी केले आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, विशेषतः ज्यांना इतर आरोग्य समस्या आहेत, त्यांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्या, बहुतेक रुग्ण सौम्य लक्षणांसह घरीच बरे होत आहेत, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, परंतु खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोरोना व्हायरसनं (Covid-19) राज्यासह भारतात पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी देशभरातली आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ती पावले उचलली जात आहे. शिवाय स्थानिक प्रशासनाला ही त्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

सध्या महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई, पुण्यासह राज्यभरात देखील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता नियमांचे पालन करून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सल्ला दिला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना उद्रेकपंढरपूर आषाढी एकादशी

संबंधित बातम्या

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

गुंतवणूक भविष्याची, बचत आजची! ​स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांसाठी ‘फ्री खरेदीखत’ ऑफर जाहीर; ‘दामाजी सिटी’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; आजच 9890605962 बुकिंगसाठी कॉल करा

August 16, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​दारू प्याल तर १० हजारांचा भुर्दंड; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने ऐतिहासिक ठराव; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाचा धाडसी निर्णय; गावात दारूबंदीसाठी कडक नियमावली लागू

August 13, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश शेती दौऱ्यावर जाण्याची संधी; कृषी विभागाकडून अर्ज करण्याचे इच्छूक शेतकऱ्यांना आवाहन

August 13, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मंगळवेढ्यात तुमची जमीन, प्लॉट किंवा घर विकायचंय? मिळवा सर्वोत्तम किंमत आणि १००% सुरक्षित व्यवहार; पारदर्शकता आणि विश्वासाचे एकमेव नाव ७/१२ डेव्हलपर्स; 9970766262 व 9890605962 आजच संपर्क साधा

August 9, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठे काय आहेत हे दाखवून देऊ! मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला थेट इशारा; राजकीय वर्तुळात खळबळ

August 9, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

गाव सोडायची गरज नाही! ‘या’ उपक्रमातून तरुणांना मिळणार गावातच स्वतःचा व्यवसाय; दरमहा चांगल्या उत्पन्नाची संधी; आजच 7448233864 या नंबरवर नाव नोंदणी करा

August 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
Next Post
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

विनापरवाना वर्गणी वसूल; वीस जणांविरुध्द गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील या घटनेने माजली सर्वत्र खळबळ

ताज्या बातम्या

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

मंगळवेढ्यातील ‘त्या’ एका घटनेने खळबळ! प्रांत कार्यालयाशेजारी मध्यरात्री नक्की काय घडलं? वाचा पडद्यामागचे सत्य…

August 15, 2026
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मंगळवेढ्यात आज घुमणार देशभक्तीचा सूर! ‘सुरसंगम’ व ‘माजी सैनिक संघटने’तर्फे ‘मेरे देशप्रेमियों…’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

August 15, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात चोरांचा उच्छाद! पोलीस प्रशासनाला उघडे आव्हान; घर बंद दिसताच घरफोडी करून ६७ हजारांचा ऐवज लांबवला; वाढदिवसाला गेले अन् चोरट्यांनी साधला डाव

August 15, 2026
मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

August 15, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

गुंतवणूक भविष्याची, बचत आजची! ​स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांसाठी ‘फ्री खरेदीखत’ ऑफर जाहीर; ‘दामाजी सिटी’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; आजच 9890605962 बुकिंगसाठी कॉल करा

August 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा