मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
करजगी (ता. अक्कलकोट) येथील चौडेश्वरी देवी देवस्थान यात्रेनिमित्त विनापरवाना वर्गणी वसूल करणाऱ्या वीस जणांविरुध्द अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत यात्रा कमिटीचे अध्यक्ष दयानंद बसप्पा उंबरजे यांनी फिर्याद दाखल केली.
याबाबतची हकीकत अशी की, करजगी येथे दरवर्षी चौडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. यानिमित्ताने पंचकमिटीची निवड केली जाते. त्यानुसार यंदाच्या वर्षी दयानंद उंबरजे व गेनसिध्द बागलकोटी यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यात्रेच्या अनुषंगाने वर्गणी गोळा करण्याबाबत अध्यक्ष या नात्याने उंबरजे यांनी धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडून रितसर परवानगी घेतली होती.
असे असताना पंच कमिटीला डावलून आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयची कुठलीही परवानगी न घेता प्रशांत कुंभार, बसवराज झुंजा, जगेश्वर गजा, मल्लिकार्जुन तोडकरी, सिध्दू गजा, लायप्पा भुसे, नागप्पा मदरी,
पावडेप्पा गजा, शरणू कुंभार, बसवराज कुंभार, विश्वनाथ कुंभार, महादेव कुंभार, चिदानंद कुंभार, अडवेप्पा गौडगाव, श्रावण गौडगाव, नागनाथ धसाडे,
अमीन धसाडे, सोमनाथ माळी, मल्लिनाथ माळी, राजकुमार माळी या वीस जणांनी पावती पुस्तक छापून सुमारे दीड ते दोन लाख रुपये वर्गणी गोळा केले. ही बाब निदर्शनास येताच यात्रा कमिटीचे अध्यक्ष दयानंद उंबरजे यांनी पंच कमिटीने बोलावून चर्चा केली. आणि विनापरवानगी वर्गणी गोळा केलेल्यांना याबाबत विचारणा केली असता आम्ही वर्गणी गोळा करणार तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणाले.
यासंदर्भात दयानंद उंबरजे यांनी दक्षिण पोलीस ठाणे अक्कलकोट येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता ३१८ (४) ३१६ (२) ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. धार्मिक क्षेत्रात घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र खळबळ माजली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज