मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात झालेल्या 12 घरफोड्या उघड करुन जवळपास 12 लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याप्रकरणी डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने यांचे पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी प्रशस्तीपत्रक देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
मंगळवेढा शहरात माहे जानेवारी महिन्यापासून सायंकाळी 6 ते रात्री 8 च्या दरम्यान शिक्षक कॉलनी, मित्रनगर, वनराई कॉलनी,सप्तशृंगीनगर, नागणेवाडी, चैतन्य कॉलनी, बनशंकर कॉलनी, तसेच ग्रामीण भागात अचानक भरदिवसा घरफोडीचे सत्र सुरु झाल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता.
कुटूंबिय दवाखान्याला अथवा कार्यक्रमाला बंगल्याला कुलूप लावून गेल्यानंतर चोरटे कुलूपबंद बंगले शोधून त्यांना टार्गेट करीत असे. भरदिवसा चोर्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणेही मुश्किल झाले होते.
दरम्यान हे वाढते चोरीचे प्रकार लक्षात घेवून डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी कर्तबगार पोलीसांची एक टीम तयार करुन चोरटयांची शोध मोहिम राबविली.
पोलीसांनी स्थानिक गुन्हे करणार्यांकडे गांभीर्यपुर्वक लक्ष ठेवून तांत्रिक बाबीचे गोपनीय बातमीदाराबाबत माहिती काढून सुतावरुन स्वर्ग गाठीत दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 12 घरफोड्या उघडकीस आणून 12 लाखाचे 25 तोळ्याचे दागिने जप्त करण्यात पोलीसांना यश आले.
दरम्यान मित्रनगर मध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरेचे फुटेज ताब्यात घेवून ते पोलीसांनी चेक केले असता त्यामध्ये दोन मुले वारंवार त्या भागातून वारंवार चकरा मारत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपासाला भक्कम दिशा मिळाली व त्यातून 12 घरफोड्या ओपन करण्यात पोलीसांना यश आले.
या कामगिरीबद्दल नुकतेच पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव यांनी डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील,पोलीस निरीक्षक रणजित माने आदींना या कामगिरीबद्दल त्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
या प्रमाणपत्रात भावी काळात असेच उत्कृष्टपणे कर्तव्य बजावीत रहाल व पोलीस दलाच्या उज्वल परंपरेत भर टाकाल अशी अपेक्षा त्या प्रशस्तीपत्रकात नमूद करण्यात आली आहे.
दरम्यान या दोन अधिकार्यांच्या झालेल्या कौतुकामुळे डी.वाय.एस.पी. कार्यालयातील व मंगळवेढा पोलीस ठाण्यामधील पोलीस कर्मचार्यामध्ये चेहर्यावर आनंद दिसून येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज