टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यात आलेल्या वादळी वार्यामुळे लवंगी व सलगर खु॥ येथील चोघांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने निसर्गाच्या या घटनेमुळे गोरगरीब लोकांना बेघर होण्याची वेळ येवून संसार उघड्यावर पडल्याचे चित्र आहे.
दरम्यान या घटनेची महसूल खात्याकडे नोंद झाली असून लवकरच याचे पंचनामे करणार असल्याचे सांगण्यात आले.
शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे मंगळवेढेकरांना सुर्यदर्शन झाले नाही, परिणामी उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळाला.
सायंकाळी चार वाजता अचानक वीजांचा कटकडाट करीत मंगळवेढा शहर व परिसरात वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. पावसापेक्षा वार्याचा वेग जास्त असल्यामुळे म्हाळू नामदेव मासाळ (रा.सलगर खुु॥), श्रीमंत चंदू कांबळे (रा.लवंगी रोहिदास वाडी),भुजंगा निंगाप्पा बाबर (रा.लवंगी),भिमराव कोपा सोनवणे (रा.सलगर बु॥) आदींच्या
घरावरील पत्रे उडून गेल्याने ते बेघर झाले असून त्यांचा संसार या नैसर्गिक घटनेमुळे उघड्यावर आला आहे.
एप्रिल महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस पुढीलप्रमाणे-मंगळवेढा मंडल 1 मि.मी.,मारापूर 1 मि.मी,आंधळगाव 4 मि.मी.,पाठखळ 5 मि.मी.,बोराळे 4 मि.मी., भोसे 3 मि.मी. असा पाऊस पडला आहे
उष्णतेची तीव्रता अधिक असल्यामुळे पशु-पक्षीही हैराण झाले होते. तसेच ऊस लागणीला ही उष्णता मारक ठरल्याने ऊस पिकावर अळी पडून गाबं पडत आहे. परिणामी ऊस करपून जात असल्याचे चित्र आहे.
या ऊस लागवडीला वाचविण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. शुक्रवारी मंगळवेढेकरांना ढगाळ वातावरणामुळे दिवसभर सुर्यदर्शन झाले नाही.
सायंकाळी पडलेल्या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी होवून हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज