टीम मंगळवेढा टाईम्स।
प्रत्येक जोडप्याला वाटते की, आपल्याला स्वतःचे एकतरी मुल असावे पण काही जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे. तुम्हाला मुल होण्यासाठी मंगळवेढा येथील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व आय व्ही एफ सेंटर पंढरपूर यांनी एक संधी उपलब्ध करुन दिली आहे.
शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंगळवेढा मध्ये प्रथमच टेस्ट ट्यूब बेबी साठी मोफत सल्ला आणि मार्गदर्शन मोफत वंध्यत्व निवारण शिबिर रविवार दि.20 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
दांपत्याने जोडीने या शिबिरास यावे असे आवाहन डॉ.शरद शिर्के यांनी केले आहे. या शिबिरात समुपदेशन, तपासणी निशुल्क करण्यात येणार आहे.
यासाठी आपण 9423333365 या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता.
जोडप्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी गर्भधारणा, पाळीच्या तक्रारी, टेस्ट ट्यूब बेबी बद्दल माहिती, गर्भाशयाच्या गाठी PCOS आणि इतर गर्भाशयाचे आजार त्यामुळे मूल होण्यासाठी अडचणी निर्माण होतात गर्भधारणेच्या संदर्भात सर्व चाचण्या व उपचार आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती डॉक्टर देणार आहेत.
नागरिकांनी येताना आधीची सर्व कागदपत्रे फाईल सोबत घेऊन यावी असे डॉक्टरांनी सांगितले आहे
वंध्यत्व आणि उपचार
गेल्या दोन दशकांमध्ये वंध्यत्वाची टक्केवारी लक्षणीय वाढली आहे. जोडप्याला लग्नानंतर एक वर्षानंतर कोणतेही गर्भनिरोधक साधन न वापरता शरीरसंबंध केल्यानंतरसुध्दा गर्भधारणा होत नसेल, तर त्या जोडप्यास वंध्यत्व आहे असे म्हणू शकतो.
या समस्येला स्त्री किंवा पुरुष किंवा दोघेही कारणीभूत असू शकतात. म्हणूनच स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही चाचण्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व मान्यताप्राप्त लॅबमध्ये होणे तितकेच महत्त्वाचे ठरते. त्या वैद्यकीय रिपोर्टच्या आधारे व्यक्तिगणिक उपचारांची रूपरेषा तज्ज्ञ डॉक्टर ठरवू शकतात.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज