मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
परिस्थिती कशीही असली तरी कष्ट आणि मेहनतीने मोठं यश मिळवता येतं. छत्रपती संभाजीनगर येथील सर्वसामान्य कुटुंबातील लेकीनं हे सिद्ध करून दाखवलंय.
10 बाय 10 च्या घरात आई-वडिलांसह राहणाऱ्या दीपाली प्रमोद शिंदे हिनं दहावी बोर्डाच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवले आहेत. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
बोलताना दीपालीनं आपल्या यशाबाबत सांगितलं. दीपाली शिंदे ही छत्रपती संभाजीनगरमधील रामनगर परिसरात आई-वडिलांसह राहते. दीपालीचे वडील मजुरीचे काम करतात, तर आई एका खाजगी कंपनीत काम करते.
ते सध्या फक्त 10 बाय 10 च्या खोलीत राहतात. अत्यंत प्रतिकूल आणि आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीतही, या कुटुंबाने तिच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. अभ्यासात सातत्य ठेवत, वेळेचे नियोजन करून हे घवघवीत यश मिळवले आहे.
AI क्षेत्रात इंजिनिअर व्हायचंय
दीपालीने पुढचे शिक्षण घेऊन एआय क्षेत्रात इंजिनिअर होण्याची भावना व्यक्त केली. यावेळी आम्ही दोघेही काम करतो, आम्हाला वाटले नव्हते की आमची मुलगी इतके चांगले गुण घेईल.
पण तिने घरकाम करून त्यासोबतच अभ्यास करून हे यश मिळवले आहे. तिचे इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तिने चांगले शिकावे तसेच इतर पालकांनी आपल्या मुलांना जे आवडते ते शिक्षण द्यावे, अशी प्रतिक्रिया दिपालीच्या आई – वडिलांनी दिली आहे.
दरम्यान, दीपालीच्या या यशामागे आई-वडिलांची प्रेरणा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तिची मेहनत आहे. तिच्या या यशामुळे रामनगर परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज