टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथील भीमा नदी पात्रातील गाळमिश्रीत वाळू उपसा करणाऱ्या सदर ठेकेदाराने गौणखनिजच्या दहा नियमांचा भंग केल्याने कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेवून सदरचा ठेका दि.१५ मे पासून बंद करण्यात येत असल्याचा लेखी आदेश मंगळवेढा महसूल विभागाला प्राप्त झाला आहे.
बठाण येथील भीमानदी पात्रातून गाळमिश्रीत वाळू उपसा करण्याचा शासकीय ठेका देण्यात आला होता. मंगळवेढा विभागाचे प्रांतअधिकारी बी.आर. माळी यांनी वेळोवेळी भीमा नदी पात्राला भेटी दिल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्षदर्शनी सदरचा ठेकेदार हा गौणखनिज विभागाने घालून दिलेल्या
नियमांचा भंग करीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पाहणी केली असता या मध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावल्याचे निदर्शनास आले नाही, वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी.सी. टी.व्ही. कॅमेरेचे स्क्रीन यंत्रणा तहसिल कार्यालयात कार्यान्वीत केले नाही,
वाळू भरलेल्या ठिकाणापासून ते साठा केलेल्या डेपो पर्यंत वाहन सी.सी.टी. व्हीच्या कक्षेत राहील अशी व्यवस्था केली नसल्याचे पाहणीत आढळून आले, सी.सी.टी.व्ही. अँड्रेस जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयास देणे आवश्यक होते.
परंतू ते सादर केलेची पोहच तपासणी वेळी दाखविण्यात आले नाही. नदी पात्रातून ते वाळू डेपो पर्यंत वाहूतक करणाऱ्या काही वाहनावर नोंदणी क्रमांक नसल्याचे दिसून आले.
वाळू डेपो साठीवण्याच्या ठिकाणी काटेरी तारेचे कुंपन घातलेले नाही, तसेच सुरक्षा रक्षक, सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात नव्हती, वाळू डेपोच्या ठिकाणी विदयुत पुरवठा खंडीत झाल्यावर कामकाजावर परिणाम होवू नये म्हणून जनरेटर अथवा कोणतीही व्यवस्था प्रकाशासाठी करणयत आलेली नाही,
वाळू डेपो मधून ग्राहकांना वाळू विक्री केल्यानंतर शासकीय यंत्रणा महाखनिज प्रणाली व्दारे एस.एम.एस. अलर्ट जाईल अशी व्यवस्था केलेली दिसून आली नाही, विवरण पत्र महिन्याच्या दहा तारखेला सादर केले बाबतची पोहच आढळून आली नाही,
वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची माहिती सादर केली नसल्याचे निदर्शनास आले. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना पिवळा रंग देणे बंधनकारक असताना एकही वाहन पिवळ्या रंगाचे दिसून आले नाही
आदी गौणखनिजच्या दहा नियमांचे उल्लंघन सदर ठेकेदाराने केल्याचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केल्यानंतर दि. १४ मे रोजी जिल्हाधिकारी यांनी सदरचा ठेका बंद करणेबाबत फर्मान काढल्याने गुरुवार दि.१५ रोजी तो बंद करण्यात आला आहे.
या आदेशाची प्रत कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदार यांना माहितीस्तव देण्यात येवून विभागीय आयुक्त पुणे, पोलीस अधिक्षक सोलापूर, उपअभियंता व जनसंपर्क अधिकारी आदींना याच्या प्रती देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खंदारे व प्रहार संघटनेने याबाबत वेळोवेळी आवाज उठवला होता व अनेक मोर्चे आंदोलने केली होती, यांच्या आंदोलनाला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज