मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सोन्या-चांदीच्या दुकानात कामाला लावतो म्हणून ९ महिन्यांपूर्वी मुलास घेऊन गेलेल्या सराफा व्यापाऱ्यानेच फोन करून मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची कटू वार्ता दिली अन् पित्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
दरम्यान, मुलाचा अपघात नसून घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करीत संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वाटंबरे (ता. सांगोला) येथील सीताराम रामचंद्र पवार यांनी पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
तक्रारदार सीताराम पवार यांचा मुलगा सिद्धनाथ पवार (वय २८) यास एकाने ९ महिन्यांपूर्वी महिना ३० हजार रुपये पगार देतो म्हणून मुलाला घेऊन गेला.
गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या वडिलाना कामाचे पैसे मागण्यासाठी वारंवार संपर्क करीत होते. परंतु ते त्यांना कसलीही दाद देत नव्हते.
दरम्यान, बुधवारी (दि. २६) मालक घाडगे यांनी सीताराम पवार यांना फोन करून तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे, तुम्ही तत्काळ या, असे सांगून मुलगा सिद्धनाथ यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले.
परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबाबत संशय वाटत असून, पैशाच्या कारणावरून व्यापाऱ्यांनेच मुलाचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केला.
या घटनेची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज