मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात कालच्या अहमदनगरमधील कार्यक्रमात दगडफेक झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा गौतमीच्या कार्यक्रमात राडा झाल्याची घटना समोर आली आहे.
सोलापूरच्या गौतमी पाटीलाचा कार्यक्रमात पोलिसांनी लाठीमार केला आहे. हुल्लडबाजांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
सोलापूरच्या मंद्रूपमध्ये गौतमी पाटील्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. वाढदिवसानिमित्त गौतमीची कार्यक्रम आयोजित केला होता.
नवनागापूरच्या सरपंचाच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.गौतमीचा कार्यक्रम सुरू असताना हुल्लडबाजांनी कार्यक्रमात गोंधळ घालायला सुरुवात केली.
मात्र चोख सुरक्षाव्यवस्था नसल्याने गोंधळ वाढत गेला आणि तेथे दगडफेक झाली. हुल्लडबाजांच्या या दगडफेकीत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.
गौतमीला कार्यक्रम अर्ध्यावरच बंद करावा लागला होता. यापुढे आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम घेणार नाही. असे गौतमीने सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज