mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Solapur । कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात ; ‘त्या’ रुग्णालयाविरुद्ध गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, क्राईम, सोलापूर
Solapur । कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात ; ‘त्या’ रुग्णालयाविरुद्ध गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । शासनाने कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासंबंधी वेळोवेळी सूचना व आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करीत रुग्णालयात मृत्यू झालेल्या महिलेच्या कोरोना टेस्टचा अहवाल येण्यापूर्वीच तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन संसर्गजन्य रोग पसरण्यास व इतरांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात घालण्यास कारणीभूत ठरलेल्या यशोधरा हॉस्पिटलच्या प्रशासनाविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापुरातील कोरोना या विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. तो कमी करण्याच्या हेतूने जिल्हा व महापालिका प्रशासन दिवसेंदिवस युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. मात्र यशोधरा हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेचा मृतदेह अहवाल येण्यापूर्वीच नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाईकांनाही त्या महिलेला कोरून झाल्याची पुसटशीही कल्पना नसल्याने नेहमीप्रमाणे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

करनिक नगर परिसरातील महिलेला सारी चा त्रास होऊ लागल्याने त्या महिलेच्या नातेवाईकांनी तिला यशोधरा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 26 मे रोजी त्या महिलेचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, या महिलेचे स्त्राव नमुने घेण्यात आले होते. त्या महिलेचा अहवाल येण्यापूर्वीच यशोधरा हॉस्पिटलच्या प्रशासनाने तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आणि 27 मे रोजी त्या महिलेवर अंत्यसंस्कार झाले.

28 मे रोजी त्या महिलेचा कोरोना टेस्ट अहवाल प्राप्त झाला आणि ती महिला पॉझिटिव्ह निघाल्याने नातेवाईकांसह जिल्हा प्रशासनाची झोपच उडाली. आता विलगीकरण कक्षात असलेल्या 19 व्यक्तींचे स्त्राव नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले जाणार असून त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अंत्यविधीला गेलेले 19 जण क्वारंटाईन

करनिक नगर परिसरातील एक महिला श्वसनाचा (सारीचा) त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी ती यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, त्या महिलेचे स्त्राव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवाल येण्यापूर्वीच हॉस्पिटल प्रशासनाने त्या महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन टाकला. नातेवाईकांनी एकत्रित येऊन 27 मे रोजी त्या महिलेचा अंत्यविधी उरकला. त्यानंतर 28 मे रोजी त्या महिलेला कोरोना झाल्याची माहिती अहवालावरून स्पष्ट झाले.

शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन करीत संसर्गजन्य रोग पसरविण्यासाठी व इतरांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात घालण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटलच्या प्रशासनाविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर विठ्ठल सोड यांनी या बाबतची फिर्याद दिली आहे. तत्पूर्वी, त्या महिलेच्या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या 19 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

solapur Crime against Yashodhara Hospital Corona handed over the body of the woman to relatives

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeLatest NewsSolapur

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 8, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावध व्हा! रेशन दुकानदाराने फसवले १०० हून अधिक गावकरी; बोटांचे ठसे घेऊन परस्पर काढली कर्जे? कोट्यवधींचा संशयित घोटाळा?

September 6, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उद्धट अधिकाऱ्याला दणका! वीज ग्राहकांशी गैरवर्तन भोवले; पालकमंत्र्यांचे ‘कारणे दाखवा’चे आदेश; भारनियमनाची पूर्वसूचना देणे बंधनकारक

September 10, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा

September 5, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार जनावरांचे बाजार ‘या’ तारखेपर्यंत बंद राहणार

सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार जनावरांचे बाजार 'या' तारखेपर्यंत बंद राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा