मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
दूध खरेदी दराची घसरण थांबली असून आता हळूहळू खरेदी दरात वाढ होऊ लागली आहे. मागील आठवड्यापर्यंत २८ रुपयांनी खरेदी होणाऱ्या सोनाई दूध संघाच्या दुधाला दोन रुपयांची वाढ होऊन आता ३० रुपये झाली आहे.
इंदापूर येथील सोनाई दूध संघाचे रोज ३० लाख लिटर दूध संकल होते आणि राज्यभर पुरवठा केला जातो. यामुळे आता राज्यातील इतर दूध संघाचे भावही वाढण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात दूध खरेदी दरात मोठी घसरण झाली होती. खरेदी दरात घसरण झाल्याने राज्य शासनाने प्रति लिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले होते
मागील वर्षात राज्यातील गाय दूध खरेदीवर प्रति लिटर ५ रुपये अनुदान दिले आहे. जवळपास ५ महिन्यांचे अनुदान दिले असून दोन महिन्यांचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही.
शासन अनुदान देत असल्याने दूध खरेदी वाढ होत नव्हती. मात्र डिसेंबर महिन्यात शेवटी शेवटी दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढ करीत २९ रुपये तर १ जानेवारीपासून आणखीन एक रुपया असे एक लीटर दूध खरेदीला दोन रुपये वाढ झाले आहेत म्हणजे आता गाय दूध खरेदी प्रति लिटर ३० रुपयाने होणार आहे.
वारणा, गोकुळ अगोदरच ३० रुपये
गोकुळ, वारणाचे (कोल्हापूर) संपूर्ण गाय दूध खरेदी प्रति लिटर ३३ रुपये तर राजाराम बापू पाटील (सांगली) सहकारी दूध संघाचे विभागनिहाय दर कुठे ३३ तर कुठे ३२ रुपये दिले जात होते. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर गोकुळ, वारणा व राजारामबापू या दूध संघांनी दूध खरेदी दर तीन रुपयांनी कपात केली होती. आता या तीनही संघांचा गाय दूध खरेदी दर ३० रुपये प्रति लिटर इतका आहे.
अनुदान तर बंद झालंय ?
जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत प्रति लिटर ५ रुपये अनुदान राज्य शासनाकडून देण्यात आले आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांत प्रति लिटर सात रुपये अनुदान जाहीर केले आहे. त्याचे वितरण करण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आता दूध खरेदी दरात वाढ होऊ लागल्याने शासनाचे अनुदान बंद होईल असे सांगण्यात आले.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज