टीम मंगळवेढा टाईम्स ।
बार्शीबरोबरच मंगळवेढ्यात विशाल फटेच्या नावाने मालमत्ता आहे काय ? याची माहिती मिळविण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. सीएची मदत घेऊन पुरावे गोळा करण्यात येत असल्याने
आरोपीला न्यायालयीन कोठडी ठेवण्याची मागणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक संजय बोठे यांनी न्यायालयाकडे केली त्यानुसार बार्शी न्यायालयाने फटेला दि.१५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार विशाल फटे यास दिलेली त्यास पोलीस कोठडी संपताच मंगळवारी विशेष जिल्हा न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांच्यासमोर उभे करण्यात आले.
यापूर्वी त्यास दिलेली पोलिस कोठडी असतानाही ती अबाधित ठेऊन न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.
पण १ फेब्रुवारीपर्यंत पहिली दिलेली पोलीस कोठडी संपत असल्याने त्यास तपास प्रमुख यांनी उभे करताच न्यायालयीन कोठडी दिली.
याबाबत जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक प्रमुख पोलीस अधीक्षक संजय बोठे यांनी न्यायालयासमोर आरोपीस उभा करताच या गुन्ह्यातील आरोपीच्या नावे बार्शी , मंगळवेढा तालुक्यात स्थावर , जंगम मालमत्ता आहे काय याबाबत संबंधित कार्यालयास पत्रव्यवहार करून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
गुन्ह्यात सी.ए.ची मदत घेऊन आरोपी विरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे. तर आरोपीने किती गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले आहेत, त्याचे पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.
गुन्ह्याच्या उर्वरित तपासासाठी न्यायालयीन कोठडीची मागणी न्यायालयासमोर पथक प्रमुख पोलीस उपधीक्षक संजय बोठे यांनी केली होती.
त्यावर न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. यापूर्वी बार्शी येथे एका पतसंस्थेच्या लॉकरची तपासणी करण्यात आली. त्यात पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर पुणे येथे त्याच्या कार्यालयाची तपासणी केली असता सीपीयू हाती लागले.
त्या फसवणूक प्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाताला ठोस असे काहीच लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी आता मंगळवेढा येथे त्याच्या नावाने असलेल्या मालमत्तेची माहिती घेत जप्त करण्याची कार्यवाही सुरू केल्याचे दिसून येत आहे.(स्रोत:लोकमत)
फसवणुकीचा आकडा कोटीत , हाती लागले दीड लाख
फसवणुकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. १२९ तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार २४ कोटी ९९ लाख ११ हजार ५२० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
तर तपासाच्या कालावधीत या पथकांनी १ लाख ६८ हजार २९० रुपये रोख तर ५ लाख ३६ हजार ४०० रुपयांचे सुमारे १५ तोळे दागिने जप्त केल्याची माहिती न्यायालयास सादर केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज