mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विशाल फटेच्या नावाने मंगळवेढ्यात संपत्ती? मालमत्तेची माहिती घेण्यासाठी पत्रव्यवहार; जप्त करण्याची कार्यवाही सुरू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 2, 2022
in क्राईम, सोलापूर
मंगळवेढ्याच्या तरुणाने केली कोट्यवधींची फसवणूक, गुन्हा दाखल; आकडा 200 कोटींच्या वर असल्याचा दावा!

टीम मंगळवेढा टाईम्स ।

बार्शीबरोबरच मंगळवेढ्यात विशाल फटेच्या नावाने मालमत्ता आहे काय ? याची माहिती मिळविण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. सीएची मदत घेऊन पुरावे गोळा करण्यात येत असल्याने

आरोपीला न्यायालयीन कोठडी ठेवण्याची मागणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक संजय बोठे यांनी न्यायालयाकडे केली त्यानुसार बार्शी न्यायालयाने फटेला दि.१५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

शेअर बाजारात गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार विशाल फटे यास दिलेली त्यास पोलीस कोठडी संपताच मंगळवारी विशेष जिल्हा न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांच्यासमोर उभे करण्यात आले.

यापूर्वी त्यास दिलेली पोलिस कोठडी असतानाही ती अबाधित ठेऊन न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

पण १ फेब्रुवारीपर्यंत पहिली दिलेली पोलीस कोठडी संपत असल्याने त्यास तपास प्रमुख यांनी उभे करताच न्यायालयीन कोठडी दिली.

याबाबत जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक प्रमुख पोलीस अधीक्षक संजय बोठे यांनी न्यायालयासमोर आरोपीस उभा करताच या गुन्ह्यातील आरोपीच्या नावे बार्शी , मंगळवेढा तालुक्यात स्थावर , जंगम मालमत्ता आहे काय याबाबत संबंधित कार्यालयास पत्रव्यवहार करून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

गुन्ह्यात सी.ए.ची मदत घेऊन आरोपी विरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे. तर आरोपीने किती गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले आहेत, त्याचे पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.

गुन्ह्याच्या उर्वरित तपासासाठी न्यायालयीन कोठडीची मागणी न्यायालयासमोर पथक प्रमुख पोलीस उपधीक्षक संजय बोठे यांनी केली होती.

त्यावर न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. यापूर्वी बार्शी येथे एका पतसंस्थेच्या लॉकरची तपासणी करण्यात आली. त्यात पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर पुणे येथे त्याच्या कार्यालयाची तपासणी केली असता सीपीयू हाती लागले.

त्या फसवणूक प्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाताला ठोस असे काहीच लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी आता मंगळवेढा येथे त्याच्या नावाने असलेल्या मालमत्तेची माहिती घेत जप्त करण्याची कार्यवाही सुरू केल्याचे दिसून येत आहे.(स्रोत:लोकमत)

फसवणुकीचा आकडा कोटीत , हाती लागले दीड लाख

ADVERTISEMENT

फसवणुकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. १२९ तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार २४ कोटी ९९ लाख ११ हजार ५२० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

तर तपासाच्या कालावधीत या पथकांनी १ लाख ६८ हजार २९० रुपये रोख तर ५ लाख ३६ हजार ४०० रुपयांचे सुमारे १५ तोळे दागिने जप्त केल्याची माहिती न्यायालयास सादर केली आहे.

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढाविशाल फटे
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

आवताडे-परीचारकांची शिष्टाई आली कामाला! व्यापारी, सामान्यांना दिलासा द्यावा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

संभ्रम अवस्था! विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान कोणाला मिळणार पालख्यांच्या स्वागताला मामा की बापू?

June 28, 2022
आमदार शहाजी पाटील यांनी केले खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..’घर की मुर्गी दाल बराबर’ आहे; स्वतःच्याच पक्षाला लगावले टोले

महाराष्ट्रात ‘डोंगार, झाडी’ व्हायरल झाली की केली? तो कार्यकर्ता सांगतोय सत्य; मिम्सनंतर आता गाणंही व्हायरल…ऐका

June 28, 2022
मंगळवेढ्यात भाजपात उभी फूट, आ.प्रशांत परिचारकांची कट्टर विरोधक असलेल्या भालकेंशी युती; आ.आवताडेंना भाजप तालुकाध्यक्षाचे आवाहन

मंगळवेढ्यात भाजपात उभी फूट, आ.प्रशांत परिचारकांची कट्टर विरोधक असलेल्या भालकेंशी युती; आ.आवताडेंना भाजप तालुकाध्यक्षाचे आवाहन

June 28, 2022
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

खळबळजनक! सोलापूरच्या नामांकित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर..

June 27, 2022
नोकरीची संधी! मंगळवेढ्यात जॉब पाहिजे; मोठ्या कंपनीत करा नोकरी; विविध पदासाठी होणार मोठी भरती

गोल्डन चान्स! मंगळवेढ्यातील मोठ्या ज्वेलर्स कंपनीत नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

June 27, 2022
सोलापूरच्या शिवसेना माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा; फेक पोस्टने उडाली खळबळ

फळ मिळाले! शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सोलापुरातील ‘या’ दोघांची नियुक्ती; पक्षाशी एकनिष्ठता आली कामी

June 26, 2022
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भुरटे चोर! मंगळवेढ्यात नदीपात्रातून चोरटयांनी पाणीबुडी मोटर व केबल पळविली; अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल

June 26, 2022
मंगळवेढ्याच्या तरुणाने केली कोट्यवधींची फसवणूक, गुन्हा दाखल; आकडा 200 कोटींच्या वर असल्याचा दावा!

Vishal Fate Scam! विशाल फटेच्या अडचणीत वाढ; बार्शीच्या विशेष न्यायालयाने दिला दणका

June 26, 2022
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात एक लाखाची देशी दारू जप्त; ठाकरे, पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

June 25, 2022
Next Post
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

मंगळवेढ्यातील चार मंडळे डाळिंब विमा भरपाईपासून वगळले, तर विमा कंपनीचे कार्यालय फोडून टाकू; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ताज्या बातम्या

अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

करेक्ट कार्यक्रम! ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू; ‘या’ तारखेला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

June 28, 2022
Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

June 28, 2022
ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

June 28, 2022
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

विद्यार्थ्यांनो! मंगळवेढयात आज गुणवंतांचा सत्कार; करिअर विषयक मार्गदर्शन शिबीर

June 28, 2022
बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

June 28, 2022
आवताडे-परीचारकांची शिष्टाई आली कामाला! व्यापारी, सामान्यांना दिलासा द्यावा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

संभ्रम अवस्था! विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान कोणाला मिळणार पालख्यांच्या स्वागताला मामा की बापू?

June 28, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा