mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आ.आवताडेंच्या मागणीची दखल; कोविड सेंटर व ऑक्सिजनचा वाढीव साठा जिल्हाधिकारी मंगळवेढा-पंढरपूरसाठी देण्यास तयार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 5, 2021
in सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांना नवीन कोविड सेंटर उभारणीसाठी व ऑक्सिजनचा वाढीव साठा उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली आहे.

मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी आ.समाधान आवताडे यांनी केलेल्या मागणी संदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लवकरच सेवा देण्यासाठी सर्वसुविधा पुरवण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख, निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी बोलताना म्हणाले की, मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर बरोबर ऑक्सिजन कमी पडणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

आ.आवताडे यांनी केलेल्या सूचनेनुसार दोन्ही तालुक्यात कोरोना तपासणीचे (टेस्टिंगचे) प्रमाण वाढवण्याच्या सूचना तेथील स्थानिक पातळीवर दिल्या जाणार आहेत.

पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघातील कोरोनाचा वाढता कहर आणि ऑक्सिजन वायुचा तुटवडा या अनुषंगाने आज पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांचेसमवेत जिल्हाधिकारी डॉ.मिलिंद शंभरकर यांची आज भेट घेतली होती.

दरम्यान मंगळवारी आ.समाधान आवताडे यांनी टेंभुर्णी येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास भेट दिली होती. व या प्रकल्पा अंतर्गत होणाऱ्या ऑक्सिजन निर्मितीची व निर्मिती दरम्यान येणाऱ्या विविध अडचणी या विषयावरही यावेळी चर्चा झाली व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी टेंभुर्णी येथील प्लंटला कोटा वाढवून दिला असल्याचे सांगितले.

त्याचबरोबर कोरोनाच्या या महाभयंकर साथीत पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघात रुग्णांची वाढती संख्या व त्याप्रमाणात अपुरी पडणारी रिमडेसिवर इंजेक्शन, वेळेत उपलब्ध न होणारा ऑक्सिजन व मागणी तितक्या प्रमाणात न मिळणारी वॅक्सीन डोस हेही मुद्दे यावेळी चर्चिले गेले.

मतदार संघात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून यावरती आपण ठोस पाऊले उचलून लवकरात लवकर हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून प्रयत्न करूया असे अभिवचन आ. आवताडे यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी मागील वर्षापासून सुरु झालेल्या या कोरोना कालावधीत अतिशय नेटके नियोजन करून काम करणारे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.शंभरकर यांचे आ. समाधान आवताडे यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडेकोविड सेंटरजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरमंगळवेढा पंढरपूर मतदारसंघ

संबंधित बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​ग्रामस्थांनो, हेलपाटे मारायचे बंद! आता थेट सोलापूर जिल्हा परिषदेच्या CEO च्या व्हॉट्स ॲपवर पाठवा अर्ज; तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन नंबर केला जारी

May 26, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राष्ट्रीय कर्तव्य बजावताना आदर्श शिक्षकाचा उन्हाच्या तडाख्याने दुर्दैवी मृत्यू; शिक्षण क्षेत्र हादरले

May 26, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

सोलापूर विधानपरिषद निवडणूक: उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली; मुंबईत लॉबिंग सुरू; परीचारकांचे नाव आघाडीवर पण…

May 26, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

खळबळ! थेट तहसीलदारांनाच धमकावले; ‘महा-ई-सेवा’ केंद्र चालकाची मुजोरी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

May 24, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांवर गुन्हा दाखल; रक्ताचं पाणी करून शिकवले, त्याच बापावर आली भीक मागण्याची वेळ; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

May 23, 2026
Next Post

पंढरपुरात मराठा समाज आक्रमक! राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन, मंत्र्यांच्या गाड्या फोडण्याचा दिला इशारा

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..