mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपुरात मराठा समाज आक्रमक! राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन, मंत्र्यांच्या गाड्या फोडण्याचा दिला इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 5, 2021
in सोलापूर, राज्य

टीम मंगळवेढा टाइम्स। 

मराठा समाजास आरक्षणाची गरज नाही असं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टानं आज मराठा समाजाला देण्यात आलेला आरक्षण कायदा रद्द केलं आहे.

या निर्णयाच्या विरोधात पंढरपुरातील मराठा समाज आक्रमक झाला असून पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी आंदोलन सुरू केलं आहे. काही बांधवांनी अर्धनग्न होऊन सरकार विरोधात रोष व्यक्त करीत सामुहिक मुंडण आंदोलन केलं.

महाराष्ट्रातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे.राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे.

सरकार आरक्षणाच्यावतीने बाजू कमी पडल्याचा आरोप पंढरपुरातील समाज बांधवांनी केला आहे. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आम्ही मंत्री, आमदार, खासदार यांच्या गाड्या फोडू, असा इशारा दिला,

आमच्या ५६ मुलांनी आरक्षणासाठी बलिदान दिले अनेक युवक तुरुंगात आहेत,आणि सरकार गप्प आहे,हा आमच्यावर मोठा अन्याय असून आम्ही याला आम्ही सडेतोड उत्तर देऊ असे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी म्हटले आहे.

आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. सकाळ पासूनच मराठा समाजातील कार्यकर्ते व आरक्षण प्रश्नांवर लढा देणारे क्रांती मोर्चाचे पदाधिकारी पंढरपुरात दाखल झाले होते. निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल म्हणून काही कार्यकर्त्यांनी जल्लोशाची तयारी केली होती. परंतु ऐनवेळी निकाल विरोधात केल्याची माहिती मिळताच त्याच कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात बोंबाबोंब मारुन आंदोलन केले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केल्यानंतर पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम तातडीने दाखल झाले. आंदोलनामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे, रामभाऊ गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, स्वागत कदम, शशिकांत पाटील, धनाजी साखळकर, संदीप मुटकूळे, संतोष कवडे आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राज्यातील एकाही मंत्र्यांना व आमदार खासदारांना रस्त्यावरुन फिर देणार नाही

सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण
कायदा रद्द केला आहे. त्यानंतर आज पंढरपुरात न्यायालयाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात मुंडण आंदोलन केले. राज्यातील एकाही मंत्र्यांना व आमदार खासदारांना रस्त्यावरुन फिर देणार नाही. प्रसंगी त्यांच्या गाड्या फोडू असा इशारा यावेळी मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी दिला.

राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार

न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे. त्यामुळे मराठा समाजावर मोठा अन्याय झाला आहे. न्यायालयात मराठा आरक्षणा संदर्भात बाजू मांडण्यास राज्यसरकार अपयशी ठरले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची एकमुखी मागणी आहे.

जो पर्यंत आरक्षण दिले जात नाही तो पर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आज पासून राज्यभर आंदोलन सुरु केले जाणार आहे, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला.

सोलापुरातील मराठा समाज आक्रमक; आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करण्याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं रद्द केले. या निषेधार्थ सोलापुरातील काही मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, मात्र आंदोलनस्थळी पोहोचताच आंदोलनकर्त्यांना सोलापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी माऊली पवार यांनी सरकार व कोर्टाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. धिक्कार असो…धिक्कार असो राज्य व केंद्र शासनाचा धिक्कार असो अशी घोषणाबाजीही माऊली पवार यांनी केली.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंढरपूरमराठा आरक्षणरद्द

संबंधित बातम्या

दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांनो! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच; प्रत्येक तासाला मिळणार ‘एवढ्या’ मिनिटांचा अधिकचा वेळ

May 19, 2022
संचारबंदीपूर्वी पंढरपूरमध्ये आषाढीसाठी आलेल्या भाविकांना पोलीस बाहेर काढणार

पंढरी गजबजनार! आषाढी वारीसाठी ‘या’ प्रमुख पालख्यांसह ‘इतके’ लाख वारकरी वाढणार

May 19, 2022
राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

May 18, 2022
मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

May 19, 2022
पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

अर्थकारण! मलिद्यासाठी वाळू ठेकेदारांमध्ये चढाओढ; ‘या’ कंपनीने टेंडर केले परत

May 18, 2022
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे मंगळवेढ्यासाठी मोठे योगदान; विशाल खंदारे यांचा संपूर्ण लेख वाचा सविस्तर

May 18, 2022
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

मंगळवेढ्यात शंभरी पार केलेल्या आजींचा वाढदिवस आज धूमधडाक्‍यात साजरा होणार; सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजन

May 18, 2022
शेतकऱ्यांन समोर पुढचे काही तास अवकाळी पावसाच संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट

नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

May 18, 2022
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजी कारखान्याचे ‘एवढे’ सभासद ठरले पात्र, ‘या’ महिन्यात मतदान होण्याची शक्यता; निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यांची नियुक्ती

May 17, 2022
Next Post
कोरोना रुग्णांना मोठा दिलासा! मोदी सरकारने रेमडेसिवीर केले स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

बाबो! सोलापूर जिल्ह्यात सुरू होता रेमडेसिव्हिरचा काळाबाजार; पोलिसांनी तिघांना केले जेरबंद

ताज्या बातम्या

दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांनो! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच; प्रत्येक तासाला मिळणार ‘एवढ्या’ मिनिटांचा अधिकचा वेळ

May 19, 2022
संचारबंदीपूर्वी पंढरपूरमध्ये आषाढीसाठी आलेल्या भाविकांना पोलीस बाहेर काढणार

पंढरी गजबजनार! आषाढी वारीसाठी ‘या’ प्रमुख पालख्यांसह ‘इतके’ लाख वारकरी वाढणार

May 19, 2022
Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

May 19, 2022
राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

May 18, 2022
मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

May 19, 2022
पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

अर्थकारण! मलिद्यासाठी वाळू ठेकेदारांमध्ये चढाओढ; ‘या’ कंपनीने टेंडर केले परत

May 18, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..