टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल सुभाष शहा यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्ताने आज विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राहुल शहा नागरी गौरव सत्कार समितीच्या वतीने देण्यात आले आहे.
आज दि.15 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता संत दामाजी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून डॉ.अशोक सुरवसे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस चेअरमन रामचंद्र जगताप, भुजंगराव पाटील, प्रा. पी.बी पाटील, संजय कट्टे, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 9 वाजता श्री संत दामाजी महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. माजी नगराध्यक्षा अरुणा माळी या उद्घाटन करणार आहेत. तर डॉ.मोहन कुलकर्णी, रामेश्वर मासाळ, लतीब तांबोळी, दत्तात्रय लाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी 6 वाजता स्वरनिनाद कोल्हापूर निर्मित सत्यम शिवम सुंदरम या मराठी हिंदी गीतांचा बहारदार नजराना आयोजित करण्यात आला आहे.
सायंकाळी 7 वाजता बँकेसमोरील पटांगणात राहुल शहा यांचा 51 वा अभिष्टचिंतन सोहळा व नागरी सत्कार समारंभ, पारितोषिक वितरण समारंभ,
रतनचंद शहा बँकेच्या वतीने क्युआर कोड व भारत बिल पेमेंट या सुविधांचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे-पाटील हे असणार आहेत.
याप्रसंगी आमदार समाधान आवताडे, आमदार प्रणितीताई शिंदे, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, विठ्ठल शुगरचे माजी चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील,
धनश्री परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव अवताडे,
जकराया शुगरचे चेअरमन बिराप्पा जाधव, दामाजी शुगर चे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, रामचंद्र वाकडे, माजी चेअरमन अँड.नंदकुमार पवार, राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, दामाजी शुगर चे माजी संचालक रामकृष्ण नागणे, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख, यशोदा पतसंस्थेच्या चेअरमन नीलाताई आटकळे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाप्रसंगी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रा.पी.बी पाटील, चंद्रशेखर कोंडूभैरी, मुझफर काझी, सोमनाथ माळी, प्रतीक किल्लेदार, डॉ.एन बी पवार, सुरेश कोडक, शंकर आवताडे, सदाशिव कुलकर्णी, भीमराव मोरे, विनायक कलुबर्मे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज