मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून अत्यावश्यक आर्थिक मदत पुरवली जाते. त्यामुळे या कक्षाकडे अर्ज सादर करण्याबरोबरच त्याचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना मंत्रालयात यावे लागते.
त्यामुळे त्यांना होणारा त्रास लक्षात घेता ही सेवा सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैशाचा अपव्यय टाळेल.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना संबंधित रुग्णालयामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामार्फत दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक साहाय्य मिळाल्याने अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे. ही मदत मिळविण्यासाठी नागरिकांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात यावे लागते.
त्यामुळे नागरिकांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयातच ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. रुग्णांना त्यांच्या जिल्ह्यातच ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’कडे मदतीचा अर्ज करण्याबरोबर, मदतीसाठी पाठपुरावा करणे सोपे होणार आहे.
यामुळे नागरिकांचा वेळ व पैशाचा अपव्यय टाळता येईल, अशी माहिती ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’चे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन
जिल्ह्यातील ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’स प्राप्त अर्जांची सद्यस्थिती नागरिकांना उपलब्ध करून देणे व समस्यांचे निराकरण करणे, अर्ज भरण्यास सहाय्य करणे, आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे, जनजागृती आणि प्रसिद्धी करणे, जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे,
तसेच अर्थसहाय्य देण्यासाठी आजारांचे पुनर्विलोकन करणे व अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करणे यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून अर्थसहाय्याच्या रकमेचा समितीमार्फत आढावा घेण्यात येणार आहे.
कारभार कागदविरहित होणार
गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’चा कारभार कागदविरहित होणार आहे. त्यामुळे हा निधी मिळविण्याच्या प्रक्रियेसाठी रुग्णांना मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. यासाठी लवकरच स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे.
धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाला जोडणार
रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली (सीएमआरएफ पोर्टल) जोडण्यात येणार आहे. सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा एओ क्रमांक आणि एम क्रमांक एकत्र करण्यात येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज