mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

छावा युवक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रवीण घाडगे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पंढरपुरात खळबळ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 14, 2020
in सोलापूर

अखिल भारतीय छावा युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण घाडगे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. ऐन दिवाळी दिवशी सकाळी हा प्रकार घडल्यानं पंढरपूरसह परिसरात खळबळ उडाली आहे.

: – अमर इलेक्ट्रॉनिक्सची भन्नाट दिवाळी ऑफर! फक्त 1 रुपये भरून मोबाइल, टीवी, फ्रीज, आणि वॉशिंग मशीन खरेदी करा

पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला येथील LT आणि HT च्या महावितरणच्या 100 कोटी निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत चौकशीची मागणी प्रवीण घाडगे यांनी केली होती.

मात्र, त्यांची ही मागणी प्रशासनानं गांभीर्यानं घेतली नाही. त्यामुळे प्रवीण घाडगे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला.

इल्क्रट्रो पाथ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी प्रवीण घाडगे यांनी केला होता. याबाबत त्यांनी चौकशीचीही मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने 14 दिवसांपूर्वी घाडगे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.

महावितरणाचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप प्रवीण घाडगे यांनी केला आहे. पोलीस घटना स्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, गेल्या महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात अशीच घटना समोर आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरात एका सामाजिक कार्यकर्त्यानं स्वतःला पेटवून घेतलं होतं. नगरपालिकेच्या आवारात ही धक्कादायक घटना घडली होती.

नरेश भोरे असं या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे. नरेश भोरे यांना तातडीनं सांगली येथील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शहापूर रस्त्यावरुन मेलेले डुक्कर घंटागाडीतून नेण्याऐवजी चक्क घंटागाडीला बांधून रस्त्यावरुन ओढून नेले जात होते. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या निदर्शनास आला होता. त्यांनी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन, गाडीला मृत डुक्कर बांधून ओढत नेण्यास घंटागाडी चालकास अटकाव केला. त्यावरुन संबंधीत गाडीच्या चालकाने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. तसेच त्याच्यावर दहशत निर्माण करुन भोरे यांना चक्क मेलेले डुक्कर उचलून घंटागाडीत टाकण्यास भाग पाडलं होतं.

याप्रकरणी कचरा उठाव करणार्‍या संबंधीत ठेकेदार व ठेका घेतलेल्या कंपनीवर पेटा अ‍ॅनिमल कायद्यातंर्गत कारवाई करावी. शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या संबंधीत घंटागाडीच्या चालकावर कारवाई करावी. या मागणीसाठी भोरे यांनी नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार भोरे यांनी आपल्यासोबत पेट्रोलची बाटली आणली होती. त्यांनी नगरपालिकेच्या इमारतीत प्रवेश केला.

प्रवेश करताच त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले. या प्रकाराने नगरपालिका आणि पोलिसांमध्ये एकच धावपळ उडाली. त्यांच्या अंगाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला पण यात ते भाजून गंभीर जखमी झाले होते. उपचारा दरम्यान भोरे यांचा मृत्यू झाला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आत्मदहनछावा संघटनापंढरपूर

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

काळजाचा थरकाप! आधी पत्नी अन् २ पोटच्या मुलांना आयस्क्रीममधून विष दिलं, नंतर मुख्याध्यापकाची आत्महत्या; पोलिसांना सापडली २२ पानांची सुसाईड नोट

June 13, 2026
वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

दोन पावले मागे, की मोठ्या झेपची तयारी? समर्थक निराश, जाणकार खूश; प्रशांत परिचारकांच्या शांत भूमिकेमागे दडलंय काय?

June 7, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
Next Post
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यानी घेतली शरद पवारांची भेट, सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर

शरद पवारांचे दिवाळीनिमित्त आईला भावनिक पत्र; आठवणींना दिला उजाळा

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

काळजाचा थरकाप! आधी पत्नी अन् २ पोटच्या मुलांना आयस्क्रीममधून विष दिलं, नंतर मुख्याध्यापकाची आत्महत्या; पोलिसांना सापडली २२ पानांची सुसाईड नोट

June 13, 2026
वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावध व्हा! ‘फ्री गिफ्ट व्हाउचर’च्या आमिषाने ४० हून अधिक जोडपे फसले; ​परदेशवारीच्या नावाखाली दाम्पत्यांना लाखोंचा चुना

June 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा