mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ग्लोबल टिचर पुन्हा अडचणीत! पैसे कोणी मागितले स्पष्टीकरण द्या; डिसले गुरुजींना बजावली नोटीस

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 25, 2022
in सोलापूर
सोलापूरच्या रणजितसिंह डिसले गुरुजींचा अमेरिकेत डंका; फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांच्या आरोपांवर सीईओ दिलीप स्वामी यांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

एका टीव्ही न्यूज चॅनलच्या मुलाखतीदरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी मानसिक त्रास दिला आणि पैशाची मागणी केल्याचा आरोप ग्लोबल टिचर डिसले यांनी केला होता.

या आरोपावर सीईओ स्वामी यांनी चौकशी करणार असल्याचे नोटीसाद्वारे जाब विचारला आहे. राज्यपाल यांचा दौरा माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेस भेट देणार होते.

या निमित्ताने ग्लोबल टिचर डिसले आणि सीईओ यांच्याशी दोनवेळा संपर्क झाले. मात्र, संपर्क दरम्यान मानसिक त्रास अथवा लाचेची मागणी होत असल्याचे सीईओ यांच्या निर्दशनास आणले नसल्याचा ठपका नोटीस ठेवण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांपासून ग्लोबल टिचर डिसले अध्ययन रजा मागण्यावरून चांगलेच चर्चेत आहेत. स्वत: ग्लोबल गुरुजी डिसले हे झेडपी शिक्षक असताना प्रशासनाला दिशाभूल करीत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे.

परदेशात अध्ययनासाठी आवश्यक ती कागदपत्रे ग्लोबल गुरुजी डिसले यांच्याकडे उपलब्ध नसताना केवळ राजकीय नेते मंडळीचा आधार घेत आध्यन रजाची मंजूरी घेतल्याचं बोललं जात आहे.

कोरोना संसर्गाच्या प्रतिबंध पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामसेवक, शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी काढलेल्या आदेशाचा दणका ग्लोबल गुरुजी रणजितसिंह डिसले यांना बसला आहे.

त्यांच्यावर एक दिवसीय बिनपगारीची कारवाई करण्यात आली आहे. डिसले गुरुजी गुरुवारी जिल्हा परिषद मुख्यालयात आले होते.

ते विनापरवाना आले म्हणून परितेवाडी शाळेतील त्यांची हजेरी बिनपगारी करण्यात आली आहे, असे माहिती स्वतः डिसले यांनीच प्रसारमाध्यमांना दिली आहे.

रणजितसिंह डिसले हे गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत गैरहजर राहिल्याने ते प्रशासकीय कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी रणजितसिंह डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

डिसले गेल्या तीन वर्षांपासून नेमणूक असलेल्या शाळेकडे फिरकलेच नाही, तीन वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय काम केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला आहे.

प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी राजकीय दबाव आणला आहे. शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी म्हटलंय.

रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप यांना जाहीर झाली आहे. या विषयावर संशोधन करण्यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे.

यासाठी १ महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजा मिळवण्यासाठी अर्ज केला होता.

गुरुवारी जेव्हा टिचर डिसले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भेटीला गेले होते, तेव्हा सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचं सांगितलं गेले होते.

त्यांना संबंधित मुख्याध्यापक यांच्याकडे अर्ज देण्यासाठी सांगितले होते. दरम्यान, १५३ दिवसांच्या परदेश अध्ययनासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डिसले गुरुजी

संबंधित बातम्या

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 3, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मोजकेच प्लॉट शिल्लक! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

August 3, 2026
Next Post

सुपर सेल! कोणत्याही मोबाईल खरेदीवर 2999 चा ब्लुटूथ हेडफोन फ्री; सर्व ॲक्सेसरीज वर 50 टक्के डिस्काउंट

ताज्या बातम्या

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 3, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 3, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा