टीम मंगळवेढा टाईम्स ।
कार्यकारी दंडाधिकारी यांचा राजमुद्रेसह गोल शिक्का बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगल्याप्रकरणी पोलिस बंधू सर्वेश्वर दामू शेजाळ (रा.गोणेवाडी) व व्ही. मोडक (मंगळवेढा) या दोघांविरूध्द भा.दं.वि .४७३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची हकिकत अशी, यातील आरोपी सर्वेश्वर दामू शेजाळ हा पोलिस बंधू असून त्याने मंगळवेढा शहरातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीच्या घरी ३५ लाखाचे दागिने चोरल्याप्रकरणी तो अटकेत आहे.
याचा तपास पोलिस करीत असताना दि .२२ जानेवारी दुपारी १२.०० पुर्वी ते मागील दहा वर्षापासून गोणेवाडी ते मंगळवेढा शहर तसेच गोणेवाडी येथील गावकामगार तलाठी, जि.प. मुख्याध्यापक, ग्रामसेवक, मंगळवेढा तहसीलदार,जनमाहिती अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार, गावकामगार पोलिस पाटील तसेच
सांगोला कडलास नाका येथील सायबर कॅफे अँड झेरॉक्स स्टेशनरी, ओम सायबर कॅफे, नाशिक येथील असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, मंगळवेढा येथील जयश्री उत्तम माने विशेष कार्यकारी अधिकारी,
मुंबई बोरीवली येथील ओम झेरॉक्स अँड स्टेशनरी, गोणेवाडी ग्रामपंचायतीचा गोल शिक्का असे विविध शिक्के व स्टँप आरोपी शेजाळ याच्याकडे चौकशीत उघड झाले.
त्यानंतर हे सर्व शिक्के बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने नकली मोहोर मंगळवेढा येथील किल्ला भागात राहणारे व्ही.मोडक यांनी आरोपीकडून कोणतेही कायदेशीर पत्र न घेता त्यास बनवून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वरील मोहोर मुद्रापट्ट नकली बनवून देवून आरोपीने बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगल्याप्रकरणी पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी वरील दोघांविरूध्द फिर्याद दाखल केली आहे.याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज