टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा शहरातून जोरात शक्तीप्रदर्शन करत जंगी पदयात्रेस सुरुवात झाली. मंगळवेढा शहरातून निघणाऱ्या पदयात्रेत जनसागर लोटला. मंगळवेढा शहरातून व तसेच ग्रामीण भागातून आलेले नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते.
मंगळवेढा शहरातील प्रत्येक घरोघरी उमेदवार अनिल सावंत यांनी भेट देत मतदारांना तुतारी या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.
दामाजी चौकापासून सुरुवात करून पुढे दत्तु गल्ली नागणे गल्ली खंडोबा गल्ली चांभार गल्ली काझी गल्ली सराफ गल्ली
गैबीसाहेब दर्गा पट्टणशेट्टी दुकान मुरलीधर चौक हजारे गल्ली होनमाने गल्ली, शिवाजी तालीम सनगर गल्ली शनिवार पेठ मेटकरी गल्ली अशाप्रकारे संपूर्ण शहरात पदयात्रा निघाली.
पदयात्रेत उमेदवार अनिल सावंत यांचे सह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राहुल शहा, विजय सावंत, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी,
शिवसेनेचे शहर प्रमुख दत्ता भोसले यांचेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे मुख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पंढरपूर शहरात देखील दोन दिवसांपूर्वी अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ मोठी पदयात्रा निघाली होती. पंढरपुरानंतर मंगळवेढा शहरात देखील अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेला जंगी प्रतिसाद मिळाला असल्याची सध्या चर्चा मंगळवेढा तालुक्यात होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज