mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील काॅपर वायरचे दुकान फोडण-या गुन्हेगार टोळीच्या आवळल्या मुसक्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 28, 2022
in क्राईम, सोलापूर
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी काॅपर वायरचे दुकान फोडण-या गुन्हेगार टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून 11 घरफोडी चोरींच्या गुन्हयांची उघड झाल्याची माहिती समोर आली आहे.

दि.9 जुन 2022 रोजी रात्री 10 वा. ते दि.11 जून 2022 रोजी सकाळी 4 वा चे दरम्यान साई कृषीसेवा केंद्र मौजे शेलगांव वांगी ता. करमाळा येथील दुकानांची लोखंडी शटर उचकटून आतमध्ये प्रवेष करून,

सबमर्शिबल मोटारीचे 4 काॅपर केबल बन्डल, 1 लॅपटाॅप, लहान काॅपर बन्डल, 2 मोबाईल असा एकूण 1,05,800 रू. किंमतीचा मुद्देमाल फिर्यादीचे संमतीशिवाय मुद्दामुन व लबाडीने घरफोडी चोरीकरून नेले म्हणून राहूल तुकाराम यादव, वय 27 वर्ष, रा. वांगी नंबर 2 ता. करमाळा यांनी

अज्ञात चोरटयाविरूध्द फिर्याद दिल्याने
करमाळा पोलीस ठाणे गुरनं 444/2022  भादवि कलम 457, 380  प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये मागील काही महिन्यापसून नातेपुते, करमाळा, टेंभूर्णी, पंढरपूर, सांगोला, वेळापूर, कुर्डूवाडी, मोहोळ इत्यादी पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये

काॅपर वायरचे दुकानाचे शटर उचकटून काॅपर वायर व मोटार चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सुहास जगताप, यांना काॅपर वायर चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशित केले होते.

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुहास जगताप,  स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक, अनिल सनगल्ले यांचे पथकास सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या.

सहा.पोलीस निरीक्षक, अनिल सनगल्ले व त्यांचे पथक सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मागावर असताना त्यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,

सवतगव्हाण ता. माळशिरस व अकलुज शहरामध्ये काॅपर वायरचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची टोळी कार्यरत असून ते गुन्हे करण्यासाठी अकलुज शहरातील पीकअप वाहनाचा वापर करत असल्याबाबत माहिती मिळाली.

सदर गुन्हयाचे तपासकामी पथक अकलुज भागात असताना, टोळीतील एक सदस्य अकलुज शहरातील जुना बसस्टॅन्ड समोरील चहा टपरीवर थांबला असल्याबाबत माहिती मिळाली.

त्यावरून तात्काळ त्याठिकाणी जावून त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास करता त्याने सांगितले की, त्याने त्याचे इतर सवतगव्हाण येथील साथीदार यांनी मिळून

मागील काही महिन्यांपासून नातेपुते, करमाळा, टेंभूर्णी, पंढरपूर, सांगोला, वेळापूर, कुर्डूवाडी, मोहोळ इत्यादी ठिकाणी रात्रीचे वेळी साथीदारासह वाहनांमध्ये जावून काॅपर वायरचे दुकानाचे शटरचे कुलपे व शटर उचकटून

दुकानातील दुकानातील काॅपर वायरचे केबल बन्डल व काॅपर वायर, मोटार इत्यादी साहित्याची चोरी केल्याचे सांगितले आहे.  त्यावरून इतर साथीदारांचा शोध घेत असताना, गुन्हयात वापरलेले वाहन व त्याचा साथीदार या दोघांची माहिती काढून त्यांना ही गुन्हयाचे कामी ताब्यात घेतले आहे.

त्यांचेकडून एकूण 530 किलो वजनाचे काॅपर वायर, 1 मोटार सायकल, गुन्हा करण्यासाठी वापरलेले पीकअप बुलेरो वाहन असा एकूण 12,26,742 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

सदर आरोपीतांकडे तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांचेकडून  खालील नमूद गुन्हे उघडकीस आले आहेत.

करमाळा, टेंभूर्णी, कुर्डूवाडी, वेळापूर , पंढरपूर शहर , मोहोळ , नातेपुते, सांगोला येथे विविध गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक  तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस  निरीक्षक अनिल सनगल्ले, पोसई शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे,

मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख, शिवाजी घोळवे, प्रकाश कारटकर, मनोहर माने व करमाळा पोलीस ठाणेचे तपासिक अंमलदार चेतन पाटील, अकलुज पोलीस ठाणेचे सुहास क्षिरसागर यांनी बजावली आहे.

करमाळा पोलीस ठाणे गुरनं 444/2022  भादवि कलम 457, 380  प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेले व फरार आरोपींची नांवे:-

1) अमोल शंकर पवार, वय 22 वर्ष , रा. सवतगव्हाण ता. माळशिरस जि. सोलापूर. ( अटक )

2) दिगंबर रामहरी माने, वय 32 वर्शे, रा. इंदिरा घरकुल, अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर. ( अटक)

3) शशिकांत रोहीदास पवार, वय 23 वर्ष, रा. जुना बैलबाझार अकलुज, ता. माळशिरस जि. सोलापूर ( अटक )

4)विजय उर्फ विजू राजू काळे, रा. बाबरी पूल म्हाळुंगषिवार अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर ( फरार)

5) गोपी विजय चव्हाण, रा. सवतगव्हाण, ता. माळशिरस जि. सोलापूर ( फरार)

6) दत्तु श्यामा चव्हाण, रा. सवतगव्हाण, ता. माळशिरस जि. सोलापूर ( फरार)

7) सुरेश राजू चव्हाण, रा. सवतगव्हाण, ता. माळशिरस जि. सोलापूर ( फरार)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: स्थानिक गुन्हे शाखा

संबंधित बातम्या

मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भक्तांना मोठा धक्का! करणी-बाधा उतरवणारा मंगळवेढ्यातील ‘बिरा महाराज’ निघाला गांजा तस्कर; एनडीपीएस कायद्यान्वये पोलिसांची मोठी कारवाई

June 26, 2026
मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

June 25, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढ्यात खळबळ! फोन नंबरच्या वादातून महिलेचा विनयभंग; एकाच कुटुंबातील ७ जणांवर गुन्हा दाखल

June 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मम्मी माफ कर, पुढील जन्मी तुझ्या पोटी जन्म घेणार, व्हिडिओ काढून आत्महत्या; नीटचा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थ्यांचे टोकाचे पाऊल

June 27, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

क्रॅकडाऊन! मंगळवेढ्यात रस्त्यावर आडवी वाहने लावताय? सावधान! थेट पोलिसांत होणार रवानगी; ‘या’ कारवाईने खळबळ

June 24, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सावधान! मंगळवेढा बस स्टँडवर चोरटे सक्रिय; वृद्धेचे दागिने आणि रोकड लंपास, गुन्हा दाखल; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

June 22, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

शेतकऱ्यांच्या संयमाचा विजय! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात शेतीसाठी मिळणार आता आठ तास वीज; ‘टाळे ठोकू’ इशाऱ्याची प्रशासनाने घेतली धडक दखल

June 21, 2026
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
Next Post
मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

फडणवीस-शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांनी केल्या मोठ्या घोषणा

ताज्या बातम्या

कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार? राज्य सरकारची मोठी घोषणा; थेट तारीख सांगितली

June 28, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या खोल्या थेट ‘सील’, मोठ्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेवकांच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यात खळबळ; ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होणार?

June 28, 2026
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

शेतात पाणी पोहोचेपर्यंत संघर्ष; चळवळीचा लढा थांबणार नाही; मंगळवेढ्यातील पाणी परिषदेत संघर्ष समितीचे शिवाजीराव काळुंगे यांनी दिला नारा

June 27, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! जमीन नसतानाही शासकीय योजनांचा लाभ मिळणार

June 27, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

न्यायालयीन लढा, सारथीच्या योजना अन् कुणबी दाखले; ‘मराठा आरक्षण कक्ष’ सांभाळणार ही ५ महत्त्वाची कामे; सरकारचे मोठे पाऊल; मंत्रालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना

June 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा