mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! लाचखोर सुरज नळे व संबंधितांनी पैसे व कोरे चेक घेतले असल्यास त्यांनी थेट लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा; अधिकाऱ्यांचे आवाहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 5, 2023
in मंगळवेढा
शेतकऱ्यांनो! लाचखोर सुरज नळे व संबंधितांनी पैसे व कोरे चेक घेतले असल्यास त्यांनी थेट लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा; अधिकाऱ्यांचे आवाहन

टीम मंगळवेढा टाईम्स। 

ज्या शेतकर्‍यांच्या रक्कमाबाबत तक्रारी असतील त्यांनी थेट कागदपत्राच्या पुराव्यासह सोलापूर लाचलुचपत विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन तपासिक अंमलदारने केले आहे.

सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्गात बाधीत झालेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम देण्यासाठी सात हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणातील आरोपी तथा तलाठी सुरज रंगनाथ नळे याच्या पोलीस कोठडीत पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने एक दिवसाची वाढ केली आहे.

दरम्यान, आता सुरज नळे व संबंधितावर तक्रारीचा ओग वाढणार असून ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. पैसे व कोरे चेक देऊन कामे केली नाहीत अशा शेतकऱ्यांची यादी वाढण्याची शक्यता आहे.

घेतलेले कोरे चेक कोणत्या बँकेत, कोणाच्या नावावर वटत असे ? याची सर्व माहिती अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी काढणार आहेत.

याप्रकरणी एका बँकेच्या अधिकाऱ्याची देखील चौकशी करण्यात आली असून हा अधिकारी, सुरज नळे व संबंधित वरीष्ठ अधिकारी यांच्या गुप्त बैठक देखील होत होत्या याची देखील माहिती नागरिक देऊ लागले आहेत.

हे लाच प्रकरण आता जिल्हाभर गाजनार असून याप्रकरणी आमदार समाधान आवताडे यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवावी अशी मागणी देखील आता पुढे येऊ लागली आहे.

महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालून या लाच प्रकरणात कोण कोण हिस्सेदार आहेत त्यांना बडतर्फ करून यांच्या मालमत्तेची चौकशी लावावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

तपासिक अंमलदार तथा पोलीस निरीक्षक उमेश महाडीक यांनी आरोपी नळे यास प्रथम न्यायालयात उभे केल्यानंतर चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत दि.4 रोजी संपल्याने पुन्हा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.

लाच प्रकरणात सहसा दुसर्‍या वेळेस पोलीस कोठडी मिळत नसल्याचा अनुभव आहे. यामध्ये मात्र न्यायालयाने दोन वेळा पोलीस कोठडी सुनावल्याने चौकशीला चांगलाच वेग आला आहे.

दरम्यान राष्ट्रीय महार्गात बाधीत झालेल्या शेतकर्‍यांच्या रक्कमा मंगळवेढा येथील एका बँकेत जमा केल्या जात असल्याने लाच प्रकरणाच्या चौकशी साठी या बँकेच्या मँनेजरची सोलापूर येथील लाचलुचपतच्या कार्यालयात मंगळवारी तब्बल अडीच तास चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शेतकर्‍यांच्या मंजूर रक्कमा देण्यासाठी आरोपी नळे टक्केवारीत रक्कमा वसूल करीत असत. ही वसूली नेमके कोणाच्या सांगण्यावरुन करीत होता घटनेच्या मुळाशी व लोकेशन काढून चौकशी होणे गरजेचे आहे.

एकटा तलाठी एवढे मोठे धाडस कधीही करु शकत नसल्याचा बोलबाला असून त्याला वरिष्ठाचा वरदहस्त असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

तपासिक अंमलदार याने निपक्ष:पातीपणे चौकशी करुन दूधाचे दूध पाण्याचे पाणी केले तरच शेतकर्‍यांना खरा न्याय मिळणार असल्याचे मत सुज्ञ नागरिकातून व्यक्त होत आहे.

शेतकरी रक्कम घेतल्यानंतर टक्केवारी देतील की नाही याचा विश्वास नसल्याने कोरे चेक ही वेळप्रसंगी घेतले जात असल्याचे बाधीत शेतकर्‍यांमधून चर्चीले जात आहे.

परिणामी याची तपासणी करण्यासाठी बँक अधिकार्‍याकडे तपासिक अंमलदार यांनी अडीच तास कसून चौकशी केली. प्रांत अधिकार्‍यांची सोमवारी जवळपास साडे तीन तास चौकशी केली असून वेळप्रसंगी अजूनही त्यांना बोलावण्यात येणार असल्याचे तपासिक अंमलदाराकडून सांगण्यात आले.

वृतपत्रात लाचप्रकरणाच्या बातम्या झळकल्यानंतर अनेक बाधीत शेतकर्‍यांकडून टक्केवारी घेवूनही मंजूर पैसे दिले नसल्याचा सूर निघत आहे.

ज्या शेतकर्‍यांच्या काही तक्रारी असतील त्यांनी थेट सोलापूर येथील लाचलुचपत विभागाशी पुराव्याच्या कागदपत्रासह लेखी तक्रारी कराव्यात असे आवाहन तपासिक अंमलदार तथा पोलीस निरीक्षक महाडीक यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कार्यालयातप्रांताधिकारी

संबंधित बातम्या

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
Next Post
दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमाचे आयोजन; मठाधिपती हिरेमठ स्वामी महाराज यांच्या हस्ते अभिष्टचिंतन सोहळा

दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमाचे आयोजन; मठाधिपती हिरेमठ स्वामी महाराज यांच्या हस्ते अभिष्टचिंतन सोहळा

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 25, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 25, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा