टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद यशवंत पाटील यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त आज दि.५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता
कारखाना कार्यस्थळावर तद्देवाडी मठाचे मठाधिपती श्री महांतेश हिरेमठ स्वामी महाराज, यांच्या हस्ते अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांनी दिली.
या कार्यक्रमास धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे, दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अॅड. नंदकुमार पवार, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा,
बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख, जिजामाता पतसंस्थेचे प्रमुख रामकृष्ण नागणे, दामाजी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रामचंद्र वाकडे, माजी संचालक यादाप्पा माळी उपस्थित रहाणार आहेत.
वाढदिवसाचे औचित्य साधून कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केला असून सदर कार्यक्रमास तालुक्यातील विविध संस्थांचे
पदाधिकारी, सभासद, हितचिंतक यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांनी केले आहे.
सदर प्रसंगी कारखान्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनिल दळवी, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर,
प्रा.रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, प्रकाश पाटील, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे,
तानाजी काकडे, सुरेश कोळेकर सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कामगार संघटना व कामगार पतसंस्थेचे पदाधिकारी यांचेसह कामगार उपस्थित होते.
लोक कौतुकाचे आभाळ मा.शिवानंद यशवंत पाटील
मा.शिवानंद यशवंत पाटील (मालक) यांचा जन्म दि.५/४/१९६८ रोजी तळसंगी ता. मंगळवेढा येथे या लहानशा खेडेगावात झाला। त्यांचे वडील यशवंत आप्पाजी पाटील यांचे ते व्दितीय सुपुत्र होत. त्यांच्यासहीत चार भावंडे आहेत.त्यापैकी मोठा भाऊ प्रगतशील बगायतदार आहे
तसेच तळसंगी गावचे मा।उपसरपंच व समाजसेवेचे काम करीत आहेत। तसेच त्यांचे दोन भाऊ रावबहादूर पाटील साहेब हे कार्यकारी अभियंता, सार्वजनीक बांधकाम विभाग पुणे येथे कार्यरत आहेत तर विजयकुमार पाटील साहेब हे उपकार्यकारी अभियंता, जलसंपदा यांत्रिक विभाग सातारा येथे कार्यरत आहेत
मालकांचे प्राथमिक शिक्षण मौजे तळसंगी गावामध्ये झाले आहे। त्यांचे माध्यमिक शिक्षण जवाहरलाल हायस्कूल मंगळवेढा येथे तर महाविद्यालयीन शिक्षण हे श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा येथे पूर्ण झाले आहे। महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना समाजकारण व राजकारणाची आवड होती
त्यावेळी दामाजी महाविद्यालयामध्ये विद्यापिठाच्या निवडणुकीमध्ये जी।एस पदी निवड झाली होती। त्यानंतर त्यांनी १९९१ रोजी मे।युवराज पाटील अँड कंपनीची स्थापना करण्यात आली आहे
तेंव्हापासून आजतागायत अनेक हातांना काम उपलब्ध करुन दिले आहे। त्याचबरोबर गावातील विकास सेवा सोसायटी च्या माध्यमातून अनेक शेतक-यांना आर्थिक मदत करण्याचे काम केले.
तसेच गावामध्ये सिध्देश्वर दूध उत्पादक संस्था स्थापन करुन दूध उत्पादकांना सुध्दा आर्थिक मदत करण्याचे काम त्यांनी केले आहे। त्याचबरोबर गावातील ग्रामपंचायत स्वनेतृत्वाखाली सन २००२ साली लढवून संपूर्ण पùनल भरघोस मतांनी निवडून आणले होते व त्याच कालावधीमध्ये (२००२ ते २००७) या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये स्वतः सरपंच म्हणून सुध्दा एक उल्लेखनीय कामगीरी केली आहे.
गावामध्ये विविध विकास योजना राबविल्या। २००२ ते आजतागायत त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतची वाटचाल सुरु आहे। त्यांनी तालुक्याच्या राजकारणात आदरणीय कि।रा।मर्दा वकीलसाहेब, रतनचंद शहा शेठजी, बंडोपंत लाळे,
प्रा।लक्ष्मणरव ढोबळे सर यांचे समवेत काम केले। ते काम करत मंगळवेढा तालुक्यातील एकमेव असणारी सहकारी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे मा।स्व।चरणुकाका पाटील यांचे कार्यकारी मंडळामध्ये संचालक म्हणून काम केले आहे
त्यांच्या या कार्याचा ठसा पाहून मरवडे जिल्हा परिषद निवडणुक सन २०१२ साली लढवली आणि ते भरघोस मतांनी निवडून सुध्दा आहे। त्यावेळी मा।सुधाकरपंत परिचारक मालक, प्रशांत मालक परिचारक यांनी पाटील साहेबावरती विश्वास दाखवून जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापतीपदी काम करण्याची संधी दिली.
तेथे सुध्दा त्यांनी पाच वर्षामध्ये जिल्हयामध्ये भरपूर काम केलेले आहे। तसेच गावात सन २०१३ साली रेवणसिध्द स्वामी विद्यामंदीर प्रशालेची स्थापना केली तेंव्हापासून गावातील गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली त्यानंतर सन २०२२ सालामध्ये झालेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मंगळवेढा तालुक्यातील समविचारी आघाडीची स्थापना करुन त्यांच्या नेतृत्वात पùनल उभे केले व ते पॅनल भरघोस मतांनी सभासदांनी निवडून दिले आहे.
त्यानंतर त्यांची चेअरमनपदी निवड झाली आहे। चेअरमनपदाचा पदभार घेतल्यानंतर आर्थिक संकटात असणारा साखर कारखाना चालु गळीत हंगामामध्ये यशस्वीपणे चालविला आहे त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील कारखान्याचे सभासद व तालुकयातील शेतकरी, सामाजीक, राजकीय कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर आज वाढदिवस ५६ वर्षात पहिल्यांदाच साजरा करण्यात येत आहे। त्यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना। त्यांच्या भावी राजकीय, सामाजीक कारकिर्दीस लाख लाख शुभेच्छा। – नानासाो मेटकरी सर, माजी सरपंच तळसंगी.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज