टीम मंगळवेढा टाईम्स ।
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याप्रकरणातील आरोपी अमोल एकनाथ सुर्यवंशी याला तब्बल 9 महिन्यानंतर सुतावरुन स्वर्ग गाठत कर्नाटक राज्यातून पकडण्यात पोलीसांना यश आले आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील आरोपी अमोल सुर्यवंशी याने दि.2 जून 2022 रोजी रात्री 8 वाजता पिडीत मुलीच्या राहते घरापासून ती अल्पवयीन मुलगी माहित असतानाही तिला लग्नाचे अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले होते.
दरम्यान याची तक्रार पिडीत मुलीच्या वडिलाने पोलीसात दिली होती. प्रथमत: तपासिक अंमलदार तथा पोलीस हवालदार सुनिल गायकवाड यांच्याकडे तपास होता.
आरोपीने मोबाईल बंद केल्यामुळे तपासात सुधारणा होत नसल्याने हा तपास गायकवाड यांच्याकडून काढून सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसो पिंगळे यांच्याकडे देण्यात आला.
तपासिक अंमलदार यांनी मोबाईल बंद असल्यामुळे आरोपी शोधणे मुश्किल असतानाही वेगळ्या पध्दतीने तपास सुरु केला.
या दरम्यान आरोपीच्या मित्राचा नंबर सातत्याने कॉलींग केल्याचा मिळून आला. आरोपी मुलीसह कर्नाटक राज्यामध्ये त्याच्या मित्राच्या घरी रहावयास होता.
या दरम्यान आरोपीने मित्राच्या नावावर दोन सीम घेवून ते डिसेंबर पर्यंत वापरले. पुन्हा घर मालकाच्या नावावर सीम कार्ड काढून घेतले.
प्रत्येक तीन महिन्याला आरोपी हा सातत्याने नंबर बदलून पोलीसांना हुलकावणी देत होता.
मात्र तपासिक अंमलदार यांनी सुतावरुन स्वर्ग गाठत मित्राच्या नंबरचा सीडीआर काढला या मध्ये जवळपास 15 लोकांचे सीडीआर चेक केल्यानंतर कुठेतरी तपासाला दिशा मिळाली
अन् तपासिक अंमलदार स.पो.नि. पिंगळे व पोलीस शिपाई वैभव घायाळ यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथे आरोपी वावरत असल्याचा सुगावा लागला
व त्यांनी अधिक माहिती काढली असता आरोपी हा एका वाहनावर चालक असल्याची माहिती मिळाली त्या आधारे तद्नंतर पोलीस अधिकार्यांनी सातारा जिल्ह्यातील लोणंद घाटात
रात्रभर जाळे लावले असता आरोपी चालक हा सुर्योदय दरम्यान वाहन उभे करुन शौचास गेल्याने तो अलगद पोलीसाच्या जाळ्यात सापडला.
पोलीसांनी आरोपीस ताब्यात घेवून मुलीची विचारपूस केली असता ती कर्नाटक राज्यात एका ठिकाणी असल्याचे चौकशी दरम्यान सांगीतले.
पोलीसांनी तेथे जावून मुलीस व आरोपीस ताब्यात घेवून मंगळवेढ्यात हजर केले व आरोपीस न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने 30 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मुलीला सोलापूर येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याचे सांगीतले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज