मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ३० लाखांचे साहित्य खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती दिलीप चव्हाण यांनी दिली.आरोग्य सभापती चव्हाण यांनी कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . भीमाशंकर जमादार ,डॉ .एस.पी. कुलकर्णी यांनी आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क , सॅनिटायझर व इतर साहित्य खरेदीसाठी मंजुरी दिली आहे . डॉक्टर , कर्मचारी व आरोग्य विभागाला मदत करणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही , असे सभापती चव्हाण यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज